(फोटो--पंचायत समितीच्या ग्रामसेविका सौ.अश्विनी धुत्रे यांचा सन्मान करताना महिला बालकल्याण सभापती गिताताई जाधव यांच्या हस्ते स्विकारताना. )
तळा (किशोर पितळे)
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंचायत समितीच्या डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात कोरोनो व निसर्ग चक्रीवादळाच्या भीषण परिस्थितीत अहोरात्र मेहनत घेऊन योगदान दिल्याबद्दल महसुल विभाग, पंचायत समितीविभाग आरोग्य विभागातीलअधिकारी कर्मचारी यांना सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह देऊनअजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी राजिप महीला बालकल्याण सभापती गीता जाधव,पंचायत समिती उपसभापती गणेश वाघमारे,नगरसेवक चंद्रकांत रोडे,नगरसेवक चंद्रकांतरोडे,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष महेंद्रकजबजे,गटविकासअधिकारीव्ही.व्ही.यादव,
ग्रामविस्तार अधिकारी नेरकर, पत्रकार संजय रिकामे, पुरुषोत्तम मुळे,किशोर शिंदे,निलेशकदम,प्रविणअंबार्ले, आदि मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचं संकट व त्या निमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन अजितदादा यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करता त्याबदल्यात कोरोनाग्रस्तांसाठी सहकार्य कराअसेआवाहनकेलेआहे अजितदादा यांनी आवाहन केल्यानंतर आ.अनिकेत तटकरेयांनी सुनिलतटकरे युवाप्रतिष्ठानच्यामाध्यमातून कोरोना आणि आपत्कालीन परिस्थितीत बहुमूल्य योगदान देऊनजनतेला दिलासा देण्याचाजो प्रामाणिक प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहे कोरोना चक्रीवादळ अशा भिषण परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्याचेठरविले त्यानुसार आज सन्मान चिन्ह वाटप करत असताना समाधान वाटत असल्याचे नगरसेवक चंद्रकांत रोडे यांनी यावेळी सांगितलेअजितदादा पवार हे महाराष्ट्रातील अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व असुन सुनिल तटकरे आणि अजितदादा यांची मैत्री सर्वश्रुत आहे.विकासाच्या बाबतीत सुनिल तटकरे देखील अजितदादा यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन काम करत आहेत.कोरोना पाश्वभुमीवर अविरतपणे काम करणाऱ्यांचा सन्मान करुन त्यांचा आत्मविश्वास
वाढविण्याचेकामअजितदादा पवार यांच्या वाढदिवस निमित्ताने आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून होतआहे त्यांचे देखील त्यांनी यावेळी आभार मानले.
Post a Comment