तळा (किशोर पितळे)तळा तालुका निर्मिती होऊन २१
वर्षाचा कालखंडलोटलाअसूनही तहसील कार्यालयात
अन्न धान्य पुरवठा विभाग व संजय गांधी निराधार योजना विभाग आकृतीबंधा प्रमाणे थाटण्यात आलेले
नाहीत हे आकृतीबंधा प्रमाणे महसूल व निवडणूक विभाग व पदे मंजूर आहेत.व इतर विभाग मंजुरीसाठी शासन दरबारी प्रलंबित आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे त्यामुळे महसूल विभागावर कामाचा अतिरिक्तताण येत आहे.वार्षिकअहवालात कार्यान्वित विभाग व रिक्त विभागांची माहिती उपजिल्हाविभागीय कार्यालय माणगांव व जिल्हा कार्यालयात पाठवली जाते तरीही या कार्यालया कडून विभाग दिले गेलेले नाहीत. हि दोन्ही विभाग महत्त्वाचे आहेत.संंजय गांधी निराधार योजना व अन्न धान्य पुरवठा विभाग अजूनही पुर्वाश्रमीच्या माणगांव तालुक्यात आहेत.संजय गांधी निराधार योजना हि अनाथ,अपंग,वृध्द, निराधार,जेष्ठ नागरिक,पेन्शन योजना व इतर योजना या विभागात कामकाज केले जाते.हे विभाग स्वतंत्र तळा तहसील मध्ये नसल्याने वेळेवर योजनेचा लाभ उपलब्ध होत नाही.तसेच नव्याने आलेली किंवा झालेली प्रकरणाचा निपटारा होत नाही.त्यामुळे तळा गाळातील लाभार्थी वंचित रहातात.तरी वरीष्ठ पातळी वरून हे महत्त्वाचे विभाग सुरू करावे अशीजनतेकडून मागणी होतआहे.
Post a Comment