गो.म.वेदक.विद्यामंदिर तळा१०वी निकाल९८.९६ % तर प्र.म.जोशी प्रशाला पन्हेळी १००%निकाल.


तळा (श्री किशोर पितळे)बुधवारी १०एस् एस् सी.च्या
विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक विद्यामंदिर तळा चा एकूण निकाल ९८.९६% लागला.तर प्रभाकर.म.जोशी प्रशाला पन्हेळी १००%निकाल लागला असून तळा हायस्कूलचा विद्यार्थी विराज गोविंदभौड८६.२०प्रथम, श्रीयश राजेश महाले ८५.८०द्वितीय कु.साक्षी गणेश काटे ८२.८०तृतीय क्रमांक उत्तीर्ण झाले.एकूण ९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला शेकडा९८.९६%लागला तर पन्हेळी हायस्कूलचा विद्यार्थी नरेश दताराम गायकर ८६.२०% प्रथम,रोशन रमेश शिगवण८३.४०% द्वितीय, कु.प्रज्ञा भिमराज जाधव८३.२०%तृतीय असा निकाल लागला आहे.एकूूण २०विद्यार्थी बसले होते पैकी २०विद्यार्थी पास होऊन१००%निकाल लागला आहे विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारा दहावीचा निकाल लागला आहे. याकडे विद्यार्थी व सर्व पालकांचे लक्ष लागले होते. ग्रामीण  दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या तळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात नेहमीच चांगल्या प्रकारे प्रगती केलेली दिसत आहे तालुक्यात तळे शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक.विद्यामंदिर तळा व डॉ. प्रभाकर म.जोशी प्रशाला पन्हेळी हे एकच आहे या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १०वी च्या परिक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी प्राचार्य शिक्षक व तालुक्यातील सर्व स्थरांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा