म्हसळा तालुक्यात कोरोनावर बहुतांश पोलीसानी केली मात ; कोरोना शहरा पाठोपाठ पसरतोय ग्रामिण भागात. म्हसळयातील बाधीतांची द्विशतकाकडे वाटचाल
संजय खांबेटे : म्हसळा
आरोग्याची पर्वा न करता पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत. ही सेवा देत असताना राज्यात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले असून म्हसळा पोलीस ठाण्यातील लागण झालेल्या चार पैकी ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी करोनावर मात करण्यास यश मिळवले आहे त्यांचे आज स. पो.नी. धनंजय पोरे व कर्मचाऱ्यानी स्वागत केले.अन्य एक पोलीस मात करून येणार आहे.
म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी-रोहिणी या गावातील रोहिणी यार्डात दिनांक 25 जुलै पासुन एकुण 46 रुग्ण कोरोना बाधीत सापडले होते.येथील यार्डा शेजारच्या तुरूंबाडी गावात आज 3 रुग्णांची वाढ झाली आहे.आता हळूहळू म्हसळा तालुक्या-तीलग्रामीण भागात कोरोनाच्या प्रादुर्भावाने शिरकाव केला असल्याचे निदर्शनास येत आहे आज म्हसळयात 6 नवीन रुग्ण सापडले आहेत तर पाच जण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती तहसीलदार शरद गोसावी यांनी दिली आहे. तालुक्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या 192 इतकी आहे त्यातील 71 रुग्ण उपचार घेत आहेत 7 रुग्ण मयत झाले आहेत 114 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.नव्याने कोरोना बाधितांमध्ये तुरूंबाडी येथील 61व 20 वर्षीय महिला,31वर्षीय पुरुष,म्हसळा काझी मोहल्ला येथील 36 वर्षीय महिला,लिपणीवावे येथील 35 वर्षीय महिला आणि वांगणी येथे 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. कोरोना प्रादुर्भावाचा शिरकाव आता तालुक्यातील ग्रामीण भागात वाढु लागल्याने शहराच्या बाजारपेठेत व आरोग्य विभागात भीती व्यक्त होत आहे.
"येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात कोरोना प्रादुर्भाव कमी करून त्यावर मात करण्यासाठी नागरिकांनी काळजीपूर्वक अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे, मास्क वापरणे, एकमेकांत किमान दोन गज किंवा ६ फूट अंतर असणे, सॅनीटायझरचा वापर करणे महत्वाचे आहे"
डॉ. महेश मेहता,नोडल वैद्यकिय अधिक्षक
ग्रामिण रुग्णालय, म्हसळा (कोव्हीड19 )
फोटो :कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून येणारे म्हसळा पोलीस
Post a Comment