म्हसळा तालुक्यात कोरोनाचे 6 नवे रुग्ण ; कोरोना बाधितांची संख्या झाली 192



म्हसळा : सुशील यादव 

म्हसळा तालुक्यात आज(29 जुलै) कोरोनाच्या 6 नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये 3 रुग्ण हे  तुरुंबाडी , 1 लिपणीवावे , १ वांगणी, तर काझी मोहल्ला , म्हसळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे म्हसळा तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या  192 वर पोहोचली आहे. अशी माहिती म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी दिली. म्हसळा तालुक्यातील 114 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर उपचार सरू असलेल्या कोरोना बधितांची संख्या 71 आहे. तालुक्यात कोरोनामुळे 7 जण दगावले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा