हातपाटीचे नावाखाली संक्शन पंपाने रेती उपसा करून होत आहे लाखो रुपयांच्या महसुलाची लुट ?


कोरोना प्रादुर्भाव कालावधीत जिल्ह्यात लॉक डाऊन असताना म्हसळा आंबेत खाडीत अवैधरित्या रेतीचे उत्तखनन ; हातपाटीचे नावाखाली संक्शन पंपाने रेती उपसा करून होत आहे लाखो रुपयांच्या महसुलाची लुट ?

म्हसळा -वार्ताहर

रायगड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवुन म्हसळा आंबेत खाडी पात्रात हातपाटीच्या नावाखाली रेतीचे संक्शन पंपाने भरमसाठ उत्तखनन करून शासकीय महसुलाची लयलूट करण्यात येत आहे.आंबेत येथे रेतीचे उत्तखनन करायला रायगड जिल्हा प्रशासनाने हतपाटीचे सहाय्याने थोडीपार परवानगी दिली आहे असे असताना  गोरेगाव-आंबेत पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत संक्शन पंपाने मोठया प्रमाणात रेतीचे उत्तखनन व वाहतुक करण्यात येत आहे.
संपुर्ण रायगड जिल्ह्यात मा.पालकमंत्री आदिती तटकरे,जिल्ह्यातील सर्व मा. आमदार,मा.जिल्हाधिकारी निधी चौधरी साहेब,जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे समनव्यातुन व त्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 15 ते 25 जुलै 2020 पर्यंत वैद्यकीय आणि काही आवश्यक गरजेच्या बाबी वगळता संपुर्ण लॉकडाऊन लागु केला आहे तसेच 4 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असा जमावबंदी आदेश देण्यात आला आहे असे असताना लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवून म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडी पात्रातून हातपाटीच्या नावाखाली पोलिसांच्या नजरे समोरच हजारो ब्रास रेतीचे उत्तखनन राजरोसपणे सुरू आहे.शासनाने मजुरांची उपासमारी होऊ नये यासाठी काही प्रमाणात हातपाटी व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची मशीन न वापरता आणि कमीत कमी मजुरांच्या मदतीने रेती उपसा करण्यास परवानगी देण्यात आली आहे असे असले तरी येथे आता शासन नियम धाब्यावर बसवून अनेक व्यावसायिक खाडीच्या खोल पात्रात संक्शन पंपाने रेतीचे उत्तखनन करून मोठया प्रमाणात रेतीचा उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवीत आहेत.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करू नये,मास्क लावुन काम करणे व अन्य बाबीची दक्षता घेणे आवश्यक असताना येथे या नियमांना मुठमाती देवुन केवळ दाम करी काम ह्या गोष्टीला महत्त्व दिले गेले आहे.एक एका बोटीवर कमी कामगारांच्या मदतीने रेती उपसा करायचं नियम असताना येथे परराज्यातील अनेक मजुर सुरक्षित अंतर न ठेवता एकाच वेळेस रेती उत्तखनन व रेती डंप करण्याचे काम करीत असताना निदर्शनास येत आहेत.जिल्ह्यात लॉकडाऊन आणि जमावबंदी आदेश असताना आंबेत खाडीत मात्र रेती उपसा करण्याला लॉकडाऊनचा आणि जमावबंदी कायदा लागू होत नाही का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.आंबेत पोलीस चेकपोष्ट ते आंबेत पुलाचे शेजारीच होत असलेले रेती उत्तखनन केवळ 100 ते 150 मीटरच्या अंतरावर आहे.या ठिकाणी गोरेगाव पोलीस  ठाणे हद्दीतील तीन पोलीस कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत असताना त्यांचे हि बाब कशी काय निदर्शनास येत नाही हे नवलच आहे.पोलिसांचे आणि महसुली अधिकारी यांचे डोळ्यादेखत रोजच कितीतरी मालवाहतूक गाडीमधून शासन नियमांचे उल्लंघन करून राजरोसपणे रेती वाहतुक होत असताना कोणतीच कार्यवाही केली जात नाही हा मोठा गहन प्रश्न आहे.
नियम पाळा कोरोना टाळा असे शासन लोकांना रोज मोबाईल रिंगटोन प्रमाणे ओरडुन ओरडून सांगत असताना रेती उत्तखनन करीत असलेले परराज्यातील कामगार गर्दी करून दाटीवाटीने काम करीत आहेत अशाने कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.रेती डम्पिंग ठिकाणी गाडीत रेती लोड करण्यासाठी अनेक ट्रक ये जा करीत असतात यातुनच एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर कोरोना प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी ते वाढण्याची भीती नाकारता येत नाही.जिल्ह्यातील अन्य व्यवसायिकांना कायद्याच्या धाक मात्र अनधिकृत रेती उत्तखनन वेगळा कायदा आंबेत येथे पहायला मिळत आहे.
गेल्या 4 महिन्याच्या कालावधीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय उद्योग बंद पडल्याने कष्टकरी, गरीब,मोलमजुरी करणारे कामगार आणि रोजच्या रोज जीवन जगत असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही केल्या कमी होईना त्यामुळे लॉक डाऊनचा कालावधीही वाढत गेला त्यामुळे शासनाचीही आर्थिक स्थिती डबघाईस आली. हळूहळू शासनाने काही निर्बंध घालत छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरु केले त्या नुसार बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेषता मा. रायगड जिल्हा अधिकारी यांच्या परवानगीने महसुली वाढीसाठी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी पात्रातील म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडीत काही मोजक्या हातपाटी व्यावसायिकांना रेती उपसा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे मात्र शासनाच्या नियमांचा येथे कुठेच पालन होत असताना दिसत नाहीत.मुसळधार पाऊस आणि लॉकडाऊनचा फायदा घेऊन आंबेत खाडी पात्रात संक्शन पंपाच्या सहाय्याने रोज शेकडो ब्रास रेतीचे उत्तखनन करून शासनाचे लाखो रुपयांचा महसूल बुडताना निदर्शनास येत आहे.सद्यस्थितीत सर्वत्र रेतीचे उत्तखनन बंद असताना ठेकेदार मात्र चड्या दराने रेती विक्री करून आपला खिसा भरत आहेत.


बातम्या जाहिरातींसाठी संपर्क -
Mail Id - mhaslalive@gmail.com
Whatsapp - +918828462894

आपल्या तालुक्यातील बातम्या वाचण्यासाठी नियमित लॉगइन करा www.mhaslalive.com

तसेच वेबसाईटवरील 🔔 बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा... जेणेकरून म्हसळा लाईव्ह च्या प्रत्येक नवीन बातम्यांचे अपडेट आपल्याला नोटिफिकेशन च्या माध्यमातून सर्वात आधी आपल्याला मिळतील.

⚡ ताज्या घडामोडी तुमच्या whatsapp वर मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आजच Registere करा...

https://forms.gle/nfhx6dJGk4AKT9gG9

म्हसळा लाईव्ह च्या व्हाट्स अप बुलेटिन साठी आपला मोबाईल नंबर रजिस्टर केल्यांनतर.....

आपल्या फोन मध्ये हा  no +91 88284 62894 म्हसळा लाईव्ह या नावाने सेव्ह करा आणि मिळवा ताज्या बातम्या आपली व्हाट्सप वर...
-टीम म्हसळा लाईव्ह..


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा