कोरोना रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन करणे गरजेचे होते - अली कौचाली
रायगड जिल्हा लॉकडाऊन करण्यासाठी घेतला गेलेला निर्णय पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांनी एकट्याने घेतला नसुन तो जिल्ह्यातील सर्व सन्मान. आमदार आणि जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय आहे त्या बाबत माजी आमदार माणिकराव जगताप यांनी केलेली टिका खोडसाळपणाची-अली कौचाली यांचा खुलासा
म्हसळा - वार्ताहर
कोरोनाच्या बाबतीत ग्रीन झोन मध्ये असलेला रायगड जिल्हा तीन महिन्यानंतर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात पसरू लागल्याने रेड झोन मध्ये गेला. जिल्ह्यास्तरावर कोरोना प्रादुर्भाववाला आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर लॉकडाऊन करण्यासाठी जिल्हा पालकमंत्री ना.आदिती तटकरे,जिल्ह्यातील सर्व सन्माननिय आमदार,मा.जिल्हा अधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षक आदींच्या उपस्थितीत समनव्याने निर्णय घेतला गेला त्यानुसार रायगड जिल्ह्यात दिनांक 16 ते 25 जुलै 2020 पर्यंत 10 दिवसाचा लॉकडाऊन व जमावबंदी लागु केली.हा घेतलेला निर्णय जनतेच्या हिताचा आणि जीवनमरणाचा असल्याने तो स्वागतार्ह आहे असे असताना काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष,माजी आमदार माणिक जगताप यांनी कोणतीही शहानिशा न करता लॉकडाऊन बाबत विरोधी राजकरण करून जाहीर टिका टिप्पणी केली हे निषेधार्थ असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस अली कौचाली यांनी व्यक्त केले आहे.माजी आमदार माणिकराव जगताप हे आघाडी सरकार मधील पदाधिकारी आहेत त्यांनी जिल्ह्यातील उद्योग कारखान्या बाबत बोलताना आदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठपातळीवर मंत्रीमहोदय, आमदार यांची असलेल्या समनव्य समीतीकडे बोलणी करायला हवी होती तसे न करता माणिकराव यांनी लॉक डाऊन बाबत केलेले वक्तव्य हे केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन सुड भावनेतून जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतलेल्या निर्णयावर टिका केली असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस अली कौचाली यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.त्यांनी अधिक पणे स्पष्ट सांगताना कोरोना प्रादुर्भावाच्या सुरवातीला तीन महिन्याचे कालावधीत रायगड जिल्हा पूर्णपणे ग्रीन झोनमध्ये होता.पनवेल शहर व काही ग्रामीण भाग वगळता रायगड जिल्हा कोरोना मुक्त होता.माहे 3 जूनमध्ये कोकण किनारपट्टीवर रायगड,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळ आला आणि त्यामध्ये मुंबईतील चाकरमानी,नागरिक जिल्ह्यातील शहरात,गावात घरांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आले आणि मोठया प्रमाणात जिल्हा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव वाढत गेला.रायगड जिल्ह्यात सद्यस्थितीत रोज पाचशेच्या घरात कोरोना बाधीत रुग्ण सापडत असल्याने ही साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करणे गरजेचे होते.तालुका स्तरावर कोरोनचा फैलाव शहरात जास्त झाल्याने ग्रामीण भागातील जनतेला बाजारहाट करण्यासाठीची भीती निर्माण झाली होती ती कमी करण्यासाठी लॉकडाऊन करणे आवश्यक झाल्याने आणि जनतेची मागणीही तशाच पध्दतीने असल्याने लोकांनी रायगड जिल्ह्यात केलेल्या 10 दिवस लॉक डाऊनचे समर्थन केले आहे.तालुका शहरात व ग्रामीण भागात एकदाचा कोरोना प्रादुर्भाव कमी झाला तर जनतेला रोजचे व्यवहार करण्यासाठी सोईचे ठरेल असे असताना सत्तेतील माजी आमदार माणिकराव जगताप हे राजकीय विरोधाभास दाखवून जिल्ह्यातील मोठे उद्योग व्यवसाय,कारखाने बंद करा तरच रायगडची जनता लॉक डाऊनला समर्थन करेल असे वक्तव्य करतात.माजी आमदार माणिक जगताप यांनी प्रथम जिल्ह्यातील चालु असलेल्या कारखानदारीची पार्श्वभूमी समजुन घेतली पाहिजे. जिल्ह्यातील मोठे उद्योग, कारखाने हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत त्यांचे परवानगीने सुरू झाले आहेत त्याला राज्य सरकारचीही अनुमती आहे.जिल्ह्यात हे काही भागापुरते मर्यादित असले तरी नव्याने जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडत असल्याने जिल्हा प्रशासनापुढे मोठी समस्या निर्माण झाली असताना माणिकराव लॉकडाऊन बाबत वेगळे मत मांडतात या बाबत त्यांच्या मनात काय आहे हे कसे समजावे ? विधानसभा निवडणुकीत ज्यांना तीन वेळा मतदारसंघातील लोकांनी नाकारले आहे त्यांच्या बाबतीत अधिक ते काय बोलावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस अली कौचाली यांनी वार्तालाप करताना सांगितले.
बातम्या जाहिरातींसाठी संपर्क -
Mail Id - mhaslalive@gmail.com
Whatsapp - +918828462894
आपल्या तालुक्यातील बातम्या वाचण्यासाठी नियमित लॉगइन करा www.mhaslalive.com
तसेच वेबसाईटवरील 🔔 बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा... जेणेकरून म्हसळा लाईव्ह च्या प्रत्येक नवीन बातम्यांचे अपडेट आपल्याला नोटिफिकेशन च्या माध्यमातून सर्वात आधी आपल्याला मिळतील.
⚡ ताज्या घडामोडी तुमच्या whatsapp वर मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आजच Registere करा...
https://forms.gle/nfhx6dJGk4AKT9gG9
म्हसळा लाईव्ह च्या व्हाट्स अप बुलेटिन साठी आपला मोबाईल नंबर रजिस्टर केल्यांनतर.....
आपल्या फोन मध्ये हा no +91 88284 62894 म्हसळा लाईव्ह या नावाने सेव्ह करा आणि मिळवा ताज्या बातम्या आपली व्हाट्सप वर...
-टीम म्हसळा लाईव्ह..
Post a Comment