संजय खांबेटे : म्हसळा
तालुक्यात कोरोनाच्या कालावधीत शहरी व ग्रामिण जनजिव-नात कमी जास्त बदल झाले असतानाच तालुक्यांतील ३९ ग्रामपंचायतींतील ८० गाव -वाडयांतून सुमारे २० ते र१ हजार चाकरमानी दाखल झाले होते त्यापैकी बहुतांश चाकरमान्यानी शहरे लॉक डाऊन आसल्याने आपले लक्ष कुटुंबात देऊन घरांत दर्जेदार ,संकरीत व सुधारीत बियाणे -खते आणून दिल्याने साहजिकच आपल्या पारंपारिक शेतीकडे लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे तालुक्यात यावेळी ७५ हेक्टर क्षेत्रांत भात ,२० हेक्टर क्षेत्रातं नाचणी व सुमारे १५ हेक्टर क्षेत्रांत वरी पिक वाढले आसल्याचा अंदाज कृषिविभाग देत आहे.तालुक्यात मागील वर्षी २४०० हेक्टर क्षेत्रांत भाताची , ४०० हेक्टर क्षेत्रातं नाचणी
तर सुमारे १०० हेक्टर क्षेत्रां वरी पीक घेतले होते.तालुक्यात भात लावणी पूर्ण झाली असून आता तालुक्यातील शेतकरी फळ बागायतींच्या मशागतीकडे वळला असून चाकरमानी आपल्या बागायतीना खते व अंर्तगत मशागतीकडे वळला आहे. काही शेतकरी रोजगार हमी योजने अंर्तगत काजू आंबा लागवड करीत आहेत.यावेळी लावणी मध्ये सुध्दा तालुक्यां- तील चाकरमानी युवकानी यावेळी चिखलणीसाठी यंत्राचा वापर चांगल्या पध्दतीने केला गेल्याचे कृषी विस्तार अधिकारी मंगेश साळी यानी सांगितले.
"चालू सिझनला ग्रामिण भागांतून भात संकरीत व सुधारीत जातीच्या बियाण्याची मागणी बऱ्यापैकी होती मागील वेळी पेक्षा २ व्कींटल भात बियाणे जास्त विकले गेले"
निलेश सायगावकर , खते व बियाणे विक्रेते.
" आमचे गावांत को व्हीड १९च्या लॉग डाऊनमध्ये आलेल्या ग्रामस्थानी चालू खरीप हंगामात शेतीकडे विशेष लक्ष दिले खरसई मेंदडी बनोटी पट्टयांतील बहुतांश शेती व वरकस शेती लागवडी खाली आणली गेली आहे भविष्यांत ग्रामपंचायती मार्फत शेती अवजारे घेण्याचे आहेत "
निलेश मांदाडकर, सरपंच खरसई
" ग्रामिण भागातील युवकांचा कल बऱ्यापैकी शेतीकामाकडे झुकला आहे, खरीपांत तालुक्यांत भात, नागली,वरी व्यतीरीक्त शेतकऱ्यानी अन्य भाजीपाला सुद्धा बऱ्यापैकी लागवड केली आहे. रब्बींतील लागवडी बाबतही शेतकरी वर्ग चौकशी करत आहेत"
सुजय कुसाळकर, कृषी पर्यवेक्षक,कृषी विभाग म्हसळा
बातम्या जाहिरातींसाठी संपर्क -
Mail Id - mhaslalive@gmail.com
Whatsapp - +918828462894
आपल्या विभागातील बातम्या वाचण्यासाठी नियमित लॉगइन करा www.mhaslalive.com
तसेच वेबसाईटवरील 🔔 बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा... जेणेकरून म्हसळा लाईव्ह च्या प्रत्येक नवीन बातम्यांचे अपडेट आपल्याला नोटिफिकेशन च्या माध्यमातून मिळत राहतील.
⚡ ताज्या घडामोडी तुमच्या whatsapp वर मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आजच Registere करा...
https://forms.gle/nfhx6dJGk4AKT9gG9
म्हसळा लाईव्ह च्या व्हाट्स अप बुलेटिन साठी आपला मोबाईल नंबर रजिस्टर केल्यांनतर.....
आपला फोन मध्ये हा no +91 88284 62894 म्हसळा लाईव्ह या नावाने सेव्ह करा आणि मिळवा ताज्या बातम्या आपली व्हाट्सप वर...
-टीम म्हसळा लाईव्ह..
Post a Comment