दिघी सागरी पोलीसांना पी.पी.ई.किट भेट ; अंजुमन दर्दमंदान ट्रस्ट महाड यांचा सेवाभावी उपक्रम
बोर्लीपंचतन (मकरंद जाधव)
राज्यात टाळेबंदीच्या काळात सुरक्षा व्यवस्थेचे काम करणाऱ्या पोलिसांच्या जीवाला कोरोना संसर्गामुळे धोका निर्माण होत आहे. अनेक पोलिसांना कर्तव्य बजावताना कोरोना विषाणुचा संसर्ग होऊन त्यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या रक्षणासाठी चोवीस तास चोख बंदोबस्त पार पाडणाऱ्या बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाड येथील अंजुमन दर्दमंदान तालीम वो तरक्की ट्रस्ट तर्फे दहा पी.पी.ई. किट त्याचबरोबर रोगप्रतिकारक अर्सेनिक अल्बम गोळ्या आणि कोरोना संसर्गावर प्रभावी ठरलेल्या प्रसिध्द मालेगाव काढा चुर्णाचे पॕकेट दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांच्याकडे सुपुर्द करण्यातआले.यावेळी अंजुमन दर्दमंदान तालीम वो तरक्की ट्रस्टचे श्रीवर्धन व म्हसळा तालुका अध्यक्ष काझी मोहम्मद हुसैन माहीमकर आणि मौलाना सलीम दर्जी उपस्थित होते.पोलीसांच्या आरोग्याच्या काळजीने राबवीत असलेल्या अशा सेवाभावी कार्याप्रती महेंद्र शेलार यांनी या ट्रस्टचे आभार व्यक्त केले.
Post a Comment