प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
सध्या सगळीकडे कोरोना (कोव्हीड -19) या साथ रोगाने थैमान घातले असून या रोगाचे विषाणूंची साखळी रोखण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन सुरू असल्याने उद्योग धंदे, छोट्या मोठ्या खाजगी कंपन्या बंद आहेत, कंपन्या बंद असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मागील चार पाच महिन्यांपासून नागरिक कोरोना महामारीशी लढा देऊन संसाराचा रहाट गाडा चालवीत असतानाच दि.03 जून रोजी कोकण किनारपट्टी वरील रायगड, रत्नागिरी व इतर जिल्ह्यात "निसर्ग चक्री वादळ" रुपी अस्मानी नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट येऊन धडकले आणि या वादळात अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. नागरिकांचे राहते घर पडले, काही घरांचे छप्पर तुटले, फळबागा उध्वस्त झाल्या, शेतजमीन, पशुपालन अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याचबरोबर घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू पावसाने भिजून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यात लोकांचे संसार उपयोगी वस्तू नष्ट होऊन गोर गरिबांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
आर्थिक घडी विस्कटून गेली निवाऱ्याची गरज कशी भागणार या विवंचनेत अनेक गरीब कुटुंब हतबल झाली असतानाच अनेक मदतीचे हात कोकण वासीयांना मदत करीत आहेत त्यापैकी च एक 'रायगड मित्र' परिवार.
रायगड मित्र परिवारा तर्फे कोलाड आदिवासी वाडी येथील निसर्ग चक्रीवादळ ग्रस्त आदिवासी बांधवांना सिमेंट पत्रे देण्यात आले. या मदतकार्यासाठी
अश्विनी शिंदे (पुणे), राहुल फुलोरे (लंडन),
रोहन शिरुडे (जळगाव), विनय काकडे (पुणे),
युवराज संकड (पनवेल), हरिओम टाळकुटे (आंबेवाडी-कोलाड) यांनी विशेष पुढाकार व परिश्रम घेतले.
Post a Comment