प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1301.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस 155 मि.मी. उरण तालुक्यात नोंदवला गेला आहे. त्याखालोखाल मुरुडमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 81.36 मि.मी. सरासरीने 1301.80 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून आजअखेर एकूण सरासरी 1275.56 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली असून एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 39.66 टक्के इतकी आहे.आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद खालीलप्रमाणे आहे.
अलिबाग 45.00 मि.मी., पेण-80.00 मि.मी., मुरुड-154.00 मि.मी., पनवेल-92.00 मि.मी., उरण-155.00 मि.मी., कर्जत-47.40 मि.मी., खालापूर-65.00 मि.मी., माणगांव-82.00 मि.मी., रोहा-107.40 मि.मी., सुधागड-50.00 मि.मी., तळा-141.00 मि.मी., महाड-42.00 मि.मी., पोलादपूर-58.00 मि.मी., म्हसळा-48.00 मि.मी., श्रीवर्धन-87.00 मि.मी., माथेरान-48.00 मि.मी. असे आजचे एकूण पर्जन्यमान 1301.80 मि.मी. इतके आहे.
Post a Comment