म्हसळा (वार्ताहर)
म्हसळा तालुक्यात आज पाच रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून तालुक्याची संख्या शतक पार होऊन संख्या 101 पोहचली आहे.मात्र तालुक्यात त्यापैकी 48 रुग्ण बरे होऊन घरी आल्याने तालुक्यासाठी दिलासादायक घटना असल्याची माहिती तहसीलदार शरद गोसावी, तालुका वैदकीय अधिकारी गणेश कांबळे यांनी दिली.म्हसळा तालुक्यात तोंडसुरे आणी सकलप येथे प्रत्येकी एक तर शहरात गौळवाडी रमेश जैन बिल्डिंग, स्टार वन प्लाझा, रोहिदास नगर येथे प्रत्येकी एक अशे पाच रुग्ण आज तालुक्यात सापडले. उद्या रात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण रायगड जिल्ह्यात दहा दिवस लॉक डाउन असल्याने आज म्हसळा शहरात खरेदी साठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.तसेच बॅंकेतून पैसे काढण्यासाठी बँक ऑफ इंडिया जवळ खातेदारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.बँकेत तसेच बाजारात नागरिकांकडून सोशल डिस्टन्स चा फज्जा उडवण्यात आला.अजूनही नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर न पडता, सतर्क राहून तोंडाला मास्क लावून ,सोशल डिस्टन्स चे नियम पाळावे असे आव्हान तहसीलदार शरद गोसावी यांनी केले.
Post a Comment