जनतेची सेवा करणाऱ्याचे कौतुक करणे गरजेचे आहे - अनिकेत तटकरे



प्रशासकीय यंत्रणेतील  समर्पक भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ; सुनील तटकरें प्रतिष्ठान  चा स्तुत्य उपक्रम 

 
 श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

 सर्वसामान्य व्यक्तीच्या चेहऱ्यावरती  हास्य निर्माण करण्याचे काम विविध प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या कर्तबगार मेहनती कर्मचाऱ्यांमुळे  शक्य झालेले आहे. अशा कर्तुत्ववान व्यक्तीचा सन्मान करणे हे मी  माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन  विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी श्रीवर्धन नगर परिषदेत आयोजित चर्चे  प्रसंगी केले. अगोदर कोरोना व त्यानंतर चक्रीवादळ या दोन्ही संकटांमुळे तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्ती अक्षरशा त्रासलेली  आहे. चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला मोठ्या स्वरूपात आर्थिक,  मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. अशा कठीण प्रसंगी शासनाकडून जनतेप्रती असलेल्या दायित्वपोटी देण्यात येणारा  निधी हा  सर्वसामान्यांना लवकरात लवकर मिळण्याचे काम आपल्या विविध प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे ते  शक्य झालेले आहे. आरोग्य सेवका पासून, पोलीस,  महसूल नगरपरिषद, या सर्व प्रशासकीय यंत्रणेतील लोकांनी खरोखरच चांगले स्वरूपाचं काम केलेले आहे. आजमितीस  श्रीवर्धन तालुक्यातील मदत निधीची जवळपास 90 टक्के वाटप करण्यात आलेली आहे.उर्वरित वाटप लवकरच जनतेच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल. प्रशासकीय यंत्रणेने नियोजन बद्ध,  समर्पक भावनेने चक्रीवादळ प्रसंगी काम केलेले आहे. तालुक्यात महावितरणाच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी आज चर्चा केली असून त्यांच्या अडचणी सुद्धा समजून घेतलेल्या आहेत. मी आशावादी आहे की लवकरच संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातील विद्युत पुरवठा हा पूर्ववत होईल. सदरच्या कामामध्ये तालुक्यातील जनतेने मोठ्या स्वरूपात महावितरणला सहकार्य केलेले आहे. आरोग्य सेवेसंदर्भात आढावा घेतलेला असून लवकरच सर्व सुविधा पुरवण्याचे काम आरोग्य खात्यामार्फत केले जाईल यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक समस्येचे निराकरण करणे हे मी माझे काम समजतो. असे अनिकेत तटकरे यांनी सांगितले . सदर चर्चेसाठी तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे,  नगराध्य जितेंद्र सातनाक,  नगरसेवक दर्शन विचारे, किरण केळस्कर, शैलेंद्र ठाकूर, विविध प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा