शासनाच्या आदेशाचे पालन करुन सण उत्सव साजरे करा -API महेंद्र शेलार


बोर्लीपंचतन येथे शांतता समितीची सभा संपन्न
शासनाच्या आदेशाचे पालन करुन सण उत्सव साजरे करा -API महेंद्र शेलार

बोर्लीपंचतन (मकरंद जाधव)
पुढील महिन्यात येणार्‍या सणांच्या पार्श्‍वभूमीवर गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखली जावी यासाठी बोर्लीपंचतन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवार दि २८ जुलै रोजी शांतता समितीची महत्वपुर्ण बैठक शारीरीक अंतराचे योग्य ते पालन करुन आयोजित करण्यात आली.आगामी महिन्यात येणाऱ्या श्रीकृष्ण जन्मोत्सव,बकरी ईद,गणेशोत्सव,मोहर्रम या व इतर धार्मिक घटकांचे सण हे शांततेने पार पडावे या काळात जातीय सलोखा कायम राखला जावा याबाबत बैठकीत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या व गावाच्या आरोग्याबाबत शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन व कायद्याचे भान ठेवून आगामी काळात साजरे होणारे सण,उत्सव सामाजिक एकतेतून पार पाडा.शांततेतच गावाचा विकास दडला आहे.उपद्रव माजवणाऱ्या लोकांची कोणतीही गय केली जाणार नाही.विवीध सोशल साइटस् चा वापर चांगल्या व समाजहितार्थ कामासाठी करा.पोलीस व जनता यांनी समन्वयाने काम केल्यास विवीध समस्या,तक्रारी व अडीअडचणी सोडवीणे सुलभ होते.तसेच कोणत्याही प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकामी सर्व घटकांतील समाजबांधवांनी पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आव्हान दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी उपस्थितांना केले.या बैठकीत सण-उत्सवात गावांतील विजपुरवठा सुरळीत असावा.अशी मागणी करण्यात आली.
 या बैठकीला दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरपंच, उपसरपंच,पोलीस पाटील,शांतता समितीचे सदस्य,तंटामुक्त समितीचे पदाधिकारी,मुस्लिम कमिटीचे सदस्य, व्यापारी,सर्व समाज अध्यक्ष आणि स्थानिक पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा