तळा (किशोर पितळे)
तळा तालुका भाजप महीला अध्यक्षा हेमाताई मानकर याच्या कार्यप्रणालीवर वरिष्ठांनी विचारपुर्वक निर्णय घेऊन विधासभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने दक्षिण रायगड महिला जिल्हाध्यक्षापदी नियुक्ती केली असल्याचे शिक्कामोर्तब जिल्हाध्यक्ष अँड.महेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस सतीश धारप, सरचिटणीस मिलिंद पाटील, राजेश मपारा यांच्या व्हिडीओ काँन्फरन्स मिटींगमध्ये एकमतानेनिर्णय घेण्यातआला. सौ.हेमाताई मानकर या तळा तालुका महिला मोर्चा अध्यक्षपदी कार्यरत असून पक्षासाठी निष्ठेने काम करून अनेक महीलांना पक्षाच्या प्रवाहात कार्यात सामिल करून पक्षाची धेय्य धोरणे समजावून दिली पंतप्रधान उज्वला गँस सिलेंडर वाटप, शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा मोफत लाभ मिळवून दिला आहे,संजय गांधी निराधार योजनेचा गरजवंताना लाभ मिळून दिला आहे.
राजकारणा बरोबर समाज सेवेचा वसा घेऊन गोरगरीब तळा गाळातील जनतेला शासकीय योजना मिळवून दिले आहेत.वेळ प्रसंगी आर्थिक मदतीचा देखील हातदेत असतात.अल्पवयीन मुलींवरअत्याचार किंंवा विनयभंग याबाबत पिडीत महिलांना योग्य न्याय मिळून देण्यासाठी पुढाकार घेत असतात.पक्ष संघटना वाढविण्यासाठी सक्रीय कार्य करीत आहेत.तालुका समन्वयक समिती पदी सदस्य म्हणून कार्यरत असताना उपेक्षित समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला आहे.सौ.हेमाताई कडे क्रियाशिल कार्यकर्त्या म्हणून पाहिले जाते.रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाने तळा गाळातील सक्रीय कार्यकर्त्यांना सामावून घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना दिसत आहे. सद्याच्याआघाडी सरकारच्या कारभारावर जनता नाराज असल्याचे दिसून येत आहे.यादृष्टीने पक्षाने वरीष्ठ नेत्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने पक्षाशी एकनिष्ठ व समन्वय असल्याने वरीष्ठांनी दक्षिण रायगड महिलाध्यक्षापदी
नियुक्ती केली आहे. माणगांव तालुका अध्यक्ष संजय (अप्पा)ढवळे, तालुका महीला अध्यक्षा शर्मिला सत्वै
माणगांव महीला शहर अध्यक्षा दीपाली जाधव अश्विनी यादव, अश्विनी खरे यांनी आभिनंदन करुन पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या. त्यांंचे महीला वर्गातून व सर्व स्तरातून आभिनंदन होत आहे.
"भारतीय जनता पक्षाने माझ्या वर दिलेली जबाबदारी स्वीकारली असुन तीला योग्य न्याय देण्यात येईल व
पक्षाचे सबळीकरणाचे दृष्टीने प्रयत्न केला जाईल".
-सौ.हेमाताई दिंगबर मानकर, तळा तालुका महीला अध्यक्षा तथा दक्षिण रायगड महिला अध्यक्षा.
Post a Comment