म्हसळा : सुशील यादव
म्हसळा तालुक्यात आज(27 जुलै) कोरोनाच्या 9 नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये सर्वात जास्त 8 रुग्ण हे एकट्या रोहिणी यार्ड “दास ऑफशोर” कंपनी मधील आहेत तर तुरुंबाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे म्हसळा तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 185 वर पोहोचली आहे. अशी माहिती म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी दिली. याआधी याच कंपनीचा कामगार अशा ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या सर्व कोव्हीड 19 पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी तालुका आरोग्य अधिकारी गणेश कांबळे यांचे मार्फत करण्यात आली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या सर्व कामगारांना कंपनी मध्येच क्वारंटाइन करण्यात आले असून सदर कंपनीचे पूर्ण क्षेत्र उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, विभाग श्रीवर्धन अमित शेडगे यांच्याकडून याआधीच कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे
Post a Comment