म्हसळा तालुक्यात कोरोनाचे 44 नवे रुग्ण


म्हसळा तालुक्यात कोरोनाचे 44 नवे रुग्ण , कोरोना बाधितांची संख्या पोहोचली 173 वर, तर आज 25 जणांची कोरोनावर मात 

म्हसळा : सुशील यादव 

म्हसळा तालुक्यात आज(25 जुलै) कोरोनाच्या 44 नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये सर्वात जास्त 37 रुग्ण हे एकट्या रोहिणी यार्ड “दास ऑफशोर” कंपनी मधील आहेत तर उर्वरित 7 रुग्णांपैकी 1 मातोश्री पार्क म्हसळा , 1 कन्याशाळा परिसर म्हसळा, १ ब्राम्हण आळी म्हसळा , 1 पाभरे , 1 तोंडसुरे, तर 2 तुरुंबाडी येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे म्हसळा तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या थेट 173 वर पोहोचली आहे. तर आजची समाधानकारक बाब म्हणजे एकाच दिवसात एकूण 25 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आत्तार्यंत म्हसळा तालुक्यातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 100 झाली आहे.
म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै 2020 रोजी “ दास ऑफशोर” कंपनीतील एक अधिकारी आजारी असल्याने उपचारासाठी मुंबई येथे गेला होता तेथे त्याची कोव्हीड 19 तपासणी केली असता दि. 23 जुलै रोजी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला व त्याच्या संपर्कात आलेल्या 67 अधिकारी व कामगारांचे स्वॅब कोव्हीड 19 च्या तपासणी साठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 37 जण रोहिणी यार्ड मधील व 1 तुरुंबाडी येथील याच कंपनीचा कामगार अशा ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व 38 कोव्हीड 19 पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी तालुका आरोग्य अधिकारी गणेश कांबळे यांचे मार्फत करण्यात आली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तसेच सदर कामगारांना कंपनी मध्येच क्वारंटाइन  करण्यात आले असून सदर कंपनीचे पूर्ण क्षेत्र उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, विभाग श्रीवर्धन अमित शेडगे यांच्याकडून कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा