संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी-रोहिणी या गावातील रोहिणी यार्डात दिनांक 25 जुलै रोजी एकाच वेळी 37 रुग्ण बाधीत सापडले होते त्यात आज अधिक 9 रुग्णांची वाढ झाली आहे या मध्ये ८दास ऑफशोअर यार्डातील तर एकजण तुरूंबाडी येथील ६२ वर्षीय वृध्द आहे.तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १८५ इतकी आहे. तर तब्बल१०९ रुग्णांनी कोरोना वर यशस्वीपणे मात केलीअसल्याची माहिती तहसीलदार तथा करोना कमांडर शरदगोसावी यानी दिली.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९ % आहे तर मृत होण्याचे प्रमाण केवळ३.७ % आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणेश कांबळे, ग्रामिण रुग्णालयाचे कोव्हीड19चे नोडल वैद्यकिय अधिक्षक डॉ. महेश मेहता, मेंदडी, खामगाव व म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकिय अधिकारी व तालुक्या तील संपूर्ण आरोग्य यंत्रणा समन्वया ने करीत असलेल्या कामाचे श्रेय आहे अशी चर्चा आहे.
"म्हसळा शहरांत ओपन बीगेन अगेन व पुनश्च हरी ओाम ने शहरांतील व्यापार सुरळीत सुरू झाला परंतु विविध बँकांतून फार मोठया प्रमाणांत ग्राहकगर्दी करत आहेत या गर्दीमुळे कोरोना संक्रमण भविष्यांत वाढू शकेल असा जाणकारांचा अंदाज आहे.प्रशासन समन्वय साधून अगर बँक व्यवस्थापन योग्य ती उपाय योजना का करीत नाही हा टीकेचा व चर्चेचा विषय ठरत आहे"
Post a Comment