प्रतिनिधी म्हसळा
म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी-रोहिणी या गावांना लागून खाडीलगत असलेल्या दास ऑफशोर कंपनीतील तब्बल 37 कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे तर कंपनीतील ६१ वर्षीय मुळचा उरण येथील कामगार मृत झाल्याचे पुढे आले आहे. यामुळे म्हसळा शहरासह ,बोर्ली पंचतन, मेंदडी, तुरूंबाडी, रोहीणी,पाभरे या भागांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बुधवार दिं.15 जुलै रोजी दास ऑफशोर कंपनीतील एका कामगारालाअत्यवस्थ अवस्थेत पुढील उपचारांसाठी पनवेल येथे नेण्यात आले,रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नंतर दास ऑफशोर कंपनी प्रशासनाने आपल्या कंपनीतील कार्यालयीन कर्मचारी व कामगार अशी 67 जणांची कोरोना चाचणी करुन घेतली यामध्ये तब्बल 37 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला ,मोठ्या प्रमाणावर दास ऑफशोर कंपनीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तुरंबाडी, रोहीणी गावातील व परिसरांतील ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.
"रायगड जिल्ह्यात कोरोनाचे जे थैमान सुरु आहे, त्याचा उगम हा जिल्ह्यातील विविध कारखान्यांमधूनच झाला आहे. कारखान्यांत येणाऱ्या जाणाऱ्यांवर स्थानिक प्रशासनाचे कोणतेच नियंत्रण नसते कामगारांची बाजारहाट मोठ्या प्रमाणावर सुरू असते परिसरांतील खड्यांतून लागण झाली तर म्हसळ्यातील आरोग्य व्यवस्था कशी पुरी पडेल"
चिंताग्रस्त ग्रामस्थ.
Post a Comment