टीम म्हसळा लाईव्ह
‘निसर्ग’ चक्रीय वादळाने कोकणात जो हाहाकार माजला, त्यातून कोकणवासीय अजूनही सावरत आहेत. पुनर्वसन कार्यक्रमचा पुढचा म्हणून आज सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते कोकणातील दापोली व मंडणगड तालुक्यातील अनेक गावात ३०० सोलर लॅम्पचे मोफत वाटप करण्यात आले.
निसर्ग वादळग्रस्त कोकणवासियांना मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था हातभार लावत होत्या, त्यात श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर यांच्यावतीने आपल्या शेकडो स्वयंसेवकांसह पुनर्वसनाचे कार्य केले होते. यात अनेक घरांची पुनः उभारणी करण्यात आली होती. याच पुनर्वसनाचा एक भाग म्हणून श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डीलाईट सोलारचे श्री.कमलजी लाथ यांच्यावतीने २०० सोलर लॅम्प व रोटरी क्लब कोल्हापूर यांच्यावतीने १०० सोलर लॅम्प मठाकडे सुफुर्त करण्यात आले. या ३०० सोलर लॅम्पचे वितरण दापोली तालुक्यातील पाजपंढरी, आडे, उंटबर, केळशी तसेच मंडणगड तालुक्यातील वाल्मिकी नगर (वेसवी), घोसाळे ( आदिवासी वाडी), रातांबेवाडी, आसवले आदी गावातील गरजू आपतग्रस्तांना वाटप करण्यात आले. यापुढे हि हे मदतकार्य सुरूच राहणार असल्याचे मठाच्या वतीने सांगण्यात आले. या मदतकार्यासाठी श्री.कमलजी लाथ, रोटरी क्लब कोल्हापूर, अलकाताई मांडके केशवस्मृती यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले. या मदतकार्याचे नियोजन सिद्धगिरी मठाच्यावतीने श्री. प्रमोद शिंदे यांनी केले.
पूज्यश्री स्वामीजींचे विचार, कार्य, श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे उपक्रम,याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पेजला भेट द्या : https://www.facebook.com/Siddhagiri.Kolhapur
Post a Comment