रायगड पोलिसांनी आणली #ConnectingPeople ही सुविधा
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
चक्रीवादळामुळे रायगड किनारपट्टीतील गावं उद्ध्वस्त झाली आहेत. वीज, दूरध्वनी काही ठिकाणी तर गावकऱ्यांशी संपर्कही करता येत नाही, अशा परिस्थितीत अडकलेल्या कुटुंबाची माहिती जाणून घेण्यासाठी रायगड पोलीस पुढे आले आहेत. पोलिसांनी #ConnectingPeople ही सुविधा सुरु केली आहे.
Raigad Police (@RaigadPolice) Tweeted:
रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे #ConnectingPeople ही सुविधा सुरू करण्यात येत असून, चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रामध्ये आपले कुटुंबियांची माहिती जाणून घेण्यासाठी टॅग करायचे आहे. आपल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव व घरचा पूर्ण पत्ता कळवावे, असे आवाहन रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले आहे.
@InfoRaigad
Post a Comment