टीम म्हसळा लाईव्ह
वादळामुळे नुकसान झालेल्या घरांची छपरे, पत्रे, प्लास्टिक या अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीचे काही व्यापारी भाव वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. वादळापूर्वीची किंमत आणि आतांची किंमत या दरामध्ये तफावत आढळून भाव वाढ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत.
कोकणसह रायगड जिल्ह्याला निसर्गवादळाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे लाखो घरांची वाताहत झाली असून असंख्य घरांची छपरेच्या छपरे उडून गेली. निसर्गाने रायगडकरांचे कंबरडेच मोडून काढली आहेत. लोकडाऊनमुळे रोजगार धंदे बुडालेल्या रायगडकरांसाठी हा मोठा आघात आहे. परिस्थिती नसली तरी नुकसान झालेल्या आपल्या घरट्याची ताबडतोब दुरुस्ती करून आसरा मिळवण्याची धडपड सुरू आहे. मात्र यात घरासाठी पत्रे तसेच कौले खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने बहुतेक दुकानांवरील पत्रे कौले संपल्याने मोठी अडचण येत आहे.
अशा परिस्थितीत या अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीचे काही व्यापारी भाव वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. वादळापूर्वीची किंमत आणि आतांची किंमत या दरामध्ये तफावत आढळून भाव वाढ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत.
छान माहिती देत आहात. धन्यवाद👍
ReplyDeletePost a Comment