“लायन्स क्लब ” आकुर्डी-पुणे कडून “निसर्ग” चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


म्हसळा : सुशील यादव 
“लायन्स क्लब ” आकुर्डी-पुणे कडून म्हसळा तालुक्यातील पाभरे येथील कोळीवाडा येथे “निसर्ग” चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना शनिवारी(२० जुन) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की ०३ जुन रोजी  आलेल्या विनाशक “निसर्ग” चक्रीवादळामुळे म्हसळा तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये अनेकांची घरे, आंबा , काजुच्या बागा संपूर्ण उधवस्त झाल्या आहेत. तसेच कोळी बांधवांच्या घरांचे नुकसान तर झालेच पण जी होडी त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे त्या अनेक होड्यांचे देखील या चक्रीवादळात प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची गंभीरता लक्षात घेऊन या पाभरे गावातील प्रशांत बसवत, कैलास मेंदाडकर,कल्पेश मेंदाडकर या उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या गावातील नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी “लायन्स क्लब ” आकुर्डी-पुणेचे  अध्यक्ष   अॅडव्होकेट    दिलीप पाटील यांच्याशी संपर्क साधून आपल्या गावातील गरजुना जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळवून दिली. यामध्ये तब्बल ३५० कुटुंबाना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजेच्या वस्तूंपैकी तांदूळ ,गहू, तेल, डाळ , साखर, मीठ, मसाला,हळद अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी “लायन्स क्लब ” आकुर्डी-पुणे अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप पाटील, राजेंद्र कोळी, हिरामण गवई यांच्या समवेत गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते. या कार्यक्रमाचे नियोजन शिव-तीर्थ रायगड प्रतिष्ठान , सैराट मित्रमंडळ , पाभरे यांनी केले होते. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना सोशियल  डिस्टंंसींगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा