राज्यमंत्री विनोद घोसाळकरांचा म्हसळा, श्रीवर्धन दौरा



बाबू शिर्के म्हसळा वार्ताहर
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना त्वरित मदत मिळावी, २० दिवस होऊन देखील पालकमंन्त्र्याच्याच मतदार संघात वीज खंडीत झाली असल्याने व अजून देखील काही भागात नुकसानीचे पंचनामे न झाल्याने निसर्ग वादळात झोडपून निघालेल्या म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यांतील बाधितांना लवकरात लवकर मदत मिळावी, नागरीकांचे जनजीवन पुन्हा अद्ययावत होण्यासाठी राज्यमंन्त्री पदाचा दर्जा असलेले म्हाडाचे विद्यमान सभापती, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांचा आज शुक्रवार, २६  जून रोजी म्हसळा तहसील कार्यालय येथे दुपारी १ वाजता व श्रीवर्धन तहसील कार्यालय येथे दुपारी ३.३० वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे, मा. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख श्याम भोकरे,सहसंपर्क प्रमुख तुकाराम सुर्वे, सुजित तांदळेकर,तालुकाप्रमुख प्रतोष कोलथकर, महादेव पाटील, नंदू शिर्के, रवी लाड, बाळ करडे, बाबुराव चव्हाण , राजेश चव्हाण, अनिकेत पानसरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमोद घोसाळकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा