संजय खांबेटे : म्हसळा
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच "निर्सग" वादळाने संपूर्ण कोकणांत आहाकार माजवला आहे.या वाताहतीच्या केवळ नोंदी करण्यापेक्षा आता या संकटाला तोंड कसे द्यायचे, त्यातून मार्ग कसा काढायचा हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषि विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्या- तील फळबागायत दारांसाठी शनीवार दिनांक २० जून रोजी सकाळी 11 वाजताऑडियो कॉन्फरन्स अंतर्गत कार्यक्रम घेण्यात येणार आहे.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
डॉ. राजेश मांजरेकर फळबाग लागवड विषयी तज्ञ मार्गदर्शक, कृषि विज्ञान केंद्र प्रमुख रोहा व भाऊसाहेब गावडे ,(प्र) तालुका कृषी अधिकारी,म्हसळा हे शेतकऱ्यां जवळ संवाद व यांच्या माध्यमातून रायगड जिल्यातील निर्सग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात फळ बागायतींचे नुकसान झाले आहे .या बागायतीचे यापुढील नियोजन कसे करायचे तसेच फळबागायतदारांसाठी शासकीय विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.या कार्यक्रमात आपल्या सहभागासाठी संपर्क साधावा असे अवाहन रिलायन्स फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव या तालुक्यांतील आंबा -काजू फळ बागायतदारानी मोठया प्रमाणात सहभाग घेणे गरजेचे आहे
या कार्यक्रमात आपल्या सहभागासाठी संपर्क साधा
9119437854
Post a Comment