महाराष्ट्राचे पहिले कब लीडर ट्रेनर श्री प्रभाकर कर्डक सर ,ज्यांना आपण स्काऊट गाईडचे भीष्माचार्य म्हणून ओळखत होतो. त्यांचे आज सकाळी आकस्मित निधन झाले आहे. ज्यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कब विभागाला एक चांगली दिशा देण्यासाठी आयुष्य व्यतीत केलं .ज्यांनी आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा पुढे जाऊन यश मिळवण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या आनंदात आपला आनंद मानला असे गुरुतुल्य भिष्माचार्य प्रेमाने त्यांना बाबा म्हणत त्यांच्या निधनाने स्काऊट गाईड विभागाची फार मोठी न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारत देश शोकाकुल झाला आहे त्यांची अध्यापन पद्धती महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रशिक्षण घेऊन गेलेल्या शिक्षकाच्या अंगी भिनलेली आहे .हीच चळवळ आपण जोमाने पुढे नेऊन चालवावी म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते . कबिंगच्या भीष्माचार्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्राचे पहिले कब लीडर ट्रेनर श्री प्रभाकर कर्डक सरांचे निधन
Admin Team
0
Post a Comment