समाजसेवक बशीर हजवाने यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - म्हसळा तालुका मुस्लिम समाज नेते अलिशेठ कौचाली
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणी वेलफेअर अशोशियशनचे भावी अध्यक्ष समाजसेवक बशीर महमूद हजवाने फाउंडेशन तर्फे जिह्यातील तालुका गाववाडी वस्तीतल्या गोरगरीब कुटुंबातील लोकांना निसर्ग चक्रीवादळाचे संकटात बाधितांना भरीव मदत करून वादळवाऱ्यात पडलेला निवारा नव्याने उभारण्यासाठी आधार देण्याचा मोलाची कामगिरी केली आहे. 03 जून रोजीच्या निसर्ग चक्री वादळात दोनही जिल्ह्यातील अनेक गावातील बहुतांश घरे, मंदिर, मज्जीद उध्वस्त झाल्याने लोकांचे घरातील अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू पावसाचे पाण्यात भिजल्याने लोकांना मोठया संकटाला सामोरे जावे लागले होते. अशा वेळी समाजसेवक बशीर भाई हजवाने फाउंडेशनचे सर्वेसर्वा लोकांना संकट काळी मदतीला धावून गेले. त्यांनी म्हसळा तालुक्यातील लिपनिवावे, मठाची वाडी, संदेरी, आंबेत, गोंडघर, मेंदडी, श्रीवर्धन तालुक्यातील हरकोल, वडवली, बागमांडला, कोलमांडला, दिवेआगर माणगाव तालुक्यातील पुरार, गोरेगाव वडवली गावातील अनेक घरांचे उडालेले पत्र्याचे छप्पर पुर्ववत करून दिले. तसेच टोल येथील बसस्टॉपवर आणि आंबेत येथील पोलीस
चौकीला पत्रे देऊन सुधारणा केली.
पांगलोली गावातील शाळा व मज्जीद दुरुस्ती करिता 75 हजारांची रोख मदत केली. तसेच सुयोग बिरवाडकर, सुबोध पुरारकर (पुरार), रविंद्र मोरे (देवळी), लक्ष्मण महाडिक, काशीबाई महाडिक, दिपीका कोरपे (देवळी), सचिन सुतार, सरिता आमटे, अब्दाल्ला चिरवाण (लिपणी वावे), परवेझ पारकर, संदेरीत हजवाने, कारविनकर, कुणके यांसह अनेक नागरिकांना पत्रे व आर्थिक मदत केली.
समाज सेवक बशिर हजवाने फाउंडेशनने मदत देताना विशेषतः सर्वधर्मीय समभाव जोपासत गोरगरीब नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन ऐन पावसाळ्यात निवारा उभारणीसाठी आवश्यक मदत केली. फाउंडेशनने निवारा उभारणीसाठी केलेली मदत करोडो रुपयांची असून समाजसेवक बशीर हजवाने यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हसळा तालुका मुस्लिम समाज नेते अलिशेठ कौचाली यांनी माहिती देताना सांगितले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गरजु लोकांना बशिर हजवाने फाउंडेशन मार्फत मदत मिळवुन देण्यासाठी अलीशेट कौचाली यांचे मोठे योगदान आहे. हजवाने फाउंडेशनने केलेली मदत हि पडत्या काळात लाख मोलाची असुन फाटलेले आभाळाला ढिगळ लावण्याचे महान कार्य व कर्तृत्व केले आहे. या अनमोल सहकार्या बद्दल कोकणी वेलफेअर असोशियशनचे भावी अध्यक्ष तथा समाजसेवक बशिर महमूद हजवाने यांना मदत केलेल्या लोकांनी लाख लाख धन्यवाद दिले आहेत.
Post a Comment