कोरोनामुक्तीकडे चाललेल्या म्हसळा तालुक्यात अखेर सापडला कोरोना पॉझीटीव्ह


कोरोनामुक्तीकडे चाललेल्या म्हसळा तालुक्यात अखेर सापडला कोरोना पॉझीटीव्ह: लिपणीवावे गावांत सापडला कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असताना तालुक्यातील खाडीपट्टा भागातील लिपणीवावे गावात एक रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह सापडल्याने तालुक्यात भिती युक्त वातावरण सुरु झाले आहे .तालुक्यातील वारळ, खरसई,पाभरे, गायरोणे, दुर्गवाडी ( म्हसळा)कणघर, ठाकरोली तळवडे व कोळे या गावांतून सापडलेले२९पॉझीटीव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे तालुका कोरोनामुक्त होणार होता परंतु नव्याने लिपणीवावे येथील रुग्ण 
पॉझीटीव्ह सापडला. मुंबई भेंडीबाजार परिसरांत रहाणारा ३४ वर्षीय रुग्ण ११जूनला मुंबईतून लिपणीवावे येथे आला, सर्दी- खोकला -ताप अशा लक्षणांमुळे प्रथम स्थानिक डॉक्टरकडे, नंतर गोरेगाव येथे खाजगी दवाखान्यात उपचार केल्यावर तब्बेतीत फरक न झाल्याने अखेर माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड सेंटर मध्ये स्वॅब घेतला असता रुग्ण पॉझीटीव्ह आसल्याचे सांगण्यात आले. रुग्णाचे संर्पकातील ११ नातलग हायरीक्स असून त्याना घरीच कोरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान श्रीवर्धन येथील एक ख्यातनाम डॉक्टर कोरोना पॉझीटीव्ह सापडला आहे. त्यानेही म्हसळ्यातील एका खाजगी वैद्यकिय व्यवसायीकाकडे शस्त्रक्रीया केली असल्याने संबधीत वैद्यकिय व्यवसायीक कॉरंटाईन होऊन दवाखाना तात्पुरता सील करण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा