निसर्ग चक्रीवादळाने किनारपट्टी लगत असणाऱ्या गावांना दिला जोरदार फटका अजूनही जनजीवन विस्कळीत ; सौर ऊर्जा दिव्यांची मागणी.


तळा(किशोर पितळे)
जगात कोरोनासारख्या जीव घेण्या रोगाचे थैमान घातलेले असतानाच रायगड मध्ये निसर्ग चक्रीवादळाने थैमान घालून क्षणात होत्याचे ते नव्हत्याचे केले याचा फटका समुद्र किनारालगतच्या तालूक्याला चांगलाच दणका दिला आहे.सुदैवाने जीवीत हानी झाली नसलीतरी मात्र वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.काहीचे घराची कौलारू छप्परे, पत्रे,काही ची घरे जमीनदोस्त झाली.खरेदी साठी अधीक दाम मोजावा लागत आहे. आर्थिक व्यवस्था डळमळीत झाली आहे.किनारपट्टीवर आलेल्या निसर्ग वादळाच्या थैमानात संपुर्ण वीजयंत्रणा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी वादळात विजेचे खांब उन्मळून पडले, तर काही ठिकाणी मोठमोठी झाडं वीज यंत्रणेवरकोसळली.यात श्रीवर्धन म्हसळा, तळा, मुरुड, माणगांव, रोहा तालुक्यातील जवळपास सर्व वीज वाहिन्यां तुटल्याने वीजपुरवठा बंद पडल्याने गावे अंधारात बुडाली आहेत.तळा तालुक्याला बोरघर स्विचींंगकेंद्र वम्हसळातालुक्यातील पाभरे येथून वीज पुरवठा केला जातो.तालुक्यात जवळपास अकराशेच्या वर तर शहरात पन्नासच्या वर पोल कोसळले आहेत तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या आहेत. आज पंधरा दिवसाचा काळ लोटला असून सर्वांना वीजे अभावी हैराण झाले आहेत वीज नसल्याने पाणी नाही विजेवर अवलंबूनअसणारे उद्योग धंदे बंद पडले आहेत.कोरोनापाठोपाठआलेल्या या संकटाने रायगडवासीयांचे कंबरडेच मोडले आहे टाळेबंदीमुळे आधीच बिकट परीस्थितीचा सामना करताना नाकी नऊ आले.मोबाईल सर्वच ठप्प झाले आहे शासन आपल्या परीने यातुनवादळग्रस्तांना  सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.विज नसल्याने संपुर्ण तालुका अंधारात चाचपडत आहे. ज्यांची आर्थिक परीस्थिती चांगली आहे अशा लोकांनी धडाधड जनरेटरची खरेदी करुन अंधारावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत.तर वाढीव दराने पर्यायाने खरेदी करावे लागत आहे. जनरेटरवर मोबाईल चार्जिंगसाठी २०/३०रू.व साठवण टाकीतुन पाणी चढवण्यासाठी ताशी हजार रू.मोजावे लागत आहे. शासनाने प्रत्येक कुटुंबाला ५ लीटर रॉकेल मोफत देण्याची घोषणाकेली असुन त्याप्रमाणे तात्काळ रॉकेलचेवितरणासुध्दा सुरु झाले आसुन जनता समाधान व्यक्त करीत असुन शासनाला धन्यवाद देत आहे.या राँँकेल वाटपा ऐवजी जर शासनाने सौर दिव्याचे वाटप केले असते तर प्रदूषण पण होणार नाही व वीजेची  बचत होईल ग्रामीण भागात नेहमी वीज खंडित होतअसते त्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकेल व विशेष म्हणजेशेतकरी वर्गाला व बागायतदारांना उपयोग होऊ शकते अशी मागणी आपदग्रस्ताकडून केली जात आहे.

"तळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे पोल पडले असून ते काम युद्ध पातळीवर सुरु आहे. जवळपास अकराशेच्या वर पोल पडले आहेत.सद्या रोहा बदलापूर (ठाणे)येथून ५०विज तंत्रक आले असून ५४
जणांची टिम अमरावती, यवतमाळ येथून येत आहेत
 बँक, पाणी पुरवठा, शासकीय कार्यालये व शहरात टप्प्या टप्प्याने वीज पुरवठा चालू केला उर्वरित भागात लवकरात लवकर वीज येईल. नागरिकांनी सहकार्य करावे.
-श्री.डि.आर.मानवटकर, उप कार्यकारी अभियंता, महावीज वितरण तळा 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा