संजय खांबेटे : म्हसळा
कोरोना सोबतच निर्सग चक्रीवादळाने श्रीवर्धन,हरीहरेश्वर, दिवेआगर,दिघी,म्हसळा याभागांसह दक्षिण रायगड मध्ये आहाकार उडविला असतानाच श्रीवर्धन आगारातून या परिसरांत एस.टी. ची प्रवासी वाहतुक लाल परीने सुरवात केल्याने या भागातील प्रवासी व कर्मचारी श्रीवर्धन आगार प्रमुख व एस.टी. कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत आहेत
श्रीवर्धन आगारातून दिघी(१०.३० व१२.१५ ) दिघी -श्रीवर्धन ( १२.१५ व १५.१५), श्रीवर्धन- महाड (१८.१५)महाड-बाग मांडला ( ७.००) बागमांडला- श्रीवर्धन(१०.००), श्रीवर्धन माणगाव ( १३.००व १८.३०) माणगाव -श्रीवर्धन(८.०० व १५.००) अशा दिघी,बागमांडला, माणगाव, म्हसळा महाड मार्गावरील प्रवासी व अन्य कर्मचाऱ्यांसाठी फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत तर सोम दिं२६जुन पासून श्रीवर्धन -पनवेल (७.१५)पनवेल -श्रीवर्धन (१४.००),श्रीवर्धन -बोर्ली-पनवेल (१३. ००)पनवेल -बोर्ली -श्रीवर्धन (१४.००) अशा पवासी फेऱ्या सुरु होणार आसल्याचे श्रीवर्धन आगार प्रमुख यानी कळविले आहे.
"करोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून राज्यभरात एसटीची बस वाहतूक बंद ठेवण्यात आली.जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता जूनच्या सुरुवातीपासून जनजीवन पूर्वपदावर आण ण्याच्या दृष्टीने सरकारकडून पावले उचलली जात आहेत दि.१५ जून सोमवारपासून पासून आपल्या आगारातून नजीकच्या भागांत नागरी प्रवासी वाहतुक सुरु करण्यात येत आहेत. लॉकडाउन नियमांच्या अधिन राहून प्रवासी सेवा प्रवाशांच्या सहकार्यावर सुरू रहाणार आहे.एका गाडीत २२ प्रवासी आणि त्यांना मास्क अनिवार्य असणार आहे. प्रवाशांची संख्या विचारात घेऊन गाड्या सोडण्यात येणार आहेत"
मेहबुब जुनेद आगारप्रमुख, श्रीवर्धन
वाट पाहीन पण येस्टी ने जाईन हे लोकांचे विचार असले पाहिजे तेव्हा येस्टी महामंडळा चे आभार व्यक्त करल्यासारखे होईल
ReplyDeletePost a Comment