आपत्कालीन परिस्थितीत तळा नगरपंचायतीकडूनपाणी पुरवठा सुरळीत ; नागरीकांत समाधान.



तळा (किशोर पितळे)
कोरोना विषाणूजन्य संसर्ग रोगा बरोबर रायगड जिल्ह्यावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट
ओढावले या चक्रीवादळाने सर्वांना चक्रावून टाकले मात्र तालुक्यात जिवीत हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या परिस्थितीत आपदग्रस्ताचे पंचनामे व प्रत्यक्ष पहाणी केली गेली आहेयाकामी सर्वकर्मचारी, नगरसेवक सहभागी होते या काळात चक्रीवादळात अनेक वीज पोल पडले असल्याने वीज,पाणी ,इंटरनेटअत्यावश्यक सेवा ठप्प झालेली असतानाच तळा नगरपंचायतीने अंबेळी पाणी पुरवठा करण्यासाठी डिझेल पंपावर ट्रायल बेसेसवर पाणी पुरवठा सुरळीत सुरू केला.हे विकासात्मक पाऊल टाकून यशस्वी झाले आहे. प्रत्येक वार्डात पाणी पुरवठा सुरू झाल्याने महीला वर्गासह सर्व सामान्य नागरिक समाधान व्यक्त करीत असल्याचे बोलल्याचे ऐकवीत येत आहे. मा.मुख्याधिकारी माधुरी मडके, नगराध्यक्षा रेश्मामुंढे उपनगराध्यक्षा सायली खातू सर्व नगरसेवक, सेविका पाणीपुरवठा सभापती नेहा पांढरकामे व सदस्य यांनी एकमताने निर्णय घेऊन डिझेल पंपावर(जनरेटर) ट्रायल बेसेसवर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन यशस्वी करून दाखवला हे  महत्त्वाचे उल्लेखनीय व कौतुकास्पद ठरले आहे.यापुढे देखील उत्तमसेवा सुविधा मिळावी अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तळा नगरपंचायती मध्ये माझी प्रथमच नियुक्ती झाली आहे.आणी लगेचच कोरोना विषाणू संसर्ग रोगांचा
प्रादुर्भाव झाला आणी त्याबरोबर निसर्ग चक्रीवादळ 
झाले.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नगरपंचायतीची विकासाच्या दृष्टीने कामाची घडी बसविण्याचा व मुलभूत सेवा सुविधा देण्यासाठी
प्रयत्न केला जाणार असूननागरिकांनी सहकार्यकरावे.
-माधुरी मडके, मुख्याधिकारी तळा नगरपंचायत 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा