प्रतिनिधी श्रीवर्धन
चक्रीवादळाच्या तडाख्याने श्रीवर्धन तालुक्यातील सायगाव गवळीवाडी येथे भिंत पडून एका मुलाचा मृत्यू झाला. या नैसर्गिक आपत्तीत जीव गमवावा लागल्याची जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.
बुधवारी (३ जून) रायगडला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत जिल्ह्यात मोठी वित्तहानी झाली आहे. तर दुपारी 4 नंतर चक्रीवादळ जिल्ह्याबाहेर सरकल्यानंतर जीवितहानी झाल्याच्या दोन घटना समोर आल्या. या वादळात अलिबाग तालुक्यातील बंगले वाडी उमटे येथे एकाचा वीज खांब पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर रात्री उशिरा श्रीवर्धन तालुक्यातही या चक्रीवादळामुळे झालेल्या पडझडीत एका मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
तालुक्यातील सायगाव गवळीवाडी येथील अमर पंढरीनाथ जावळेकर या १६ वर्षांच्या मुलाचा भिंत पडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
Post a Comment