संजय खांबेटे : म्हसळा
तब्बल ५ वर्ष सतत दारुचे व्यसनासाठी ,प्लॅट घेण्यासाठी व अन्य छान शोक करण्यासाठी पती व सासूने केलेला छळ अती झाल्याने व सहनशीलता संपल्याने पांगळोली येथील २३ वर्ष वयाचे विवाहीत तरुणीने तक्रार केल्याने म्हसळा पोलीसानी गु.र.नं. २८ / २०२० भादवी ४९८अ, ३२३ , ५०६,५०४, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे, आपला पती व सासू यांच्या विरुद्ध पोलीसांत तक्रार केली आहे. या महिलेच्या पतीला मोठया प्रमाणात छान शोक व दारू सेवनाचे व्यसन होते २०१५ पासून पती व सासू मारहाण व मानसीक छळ करीत असत सतत ५ वर्ष छळ झाल्याने व अती झाल्याने तक्रार केल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.सदर घटनेचा तपास सपोनी धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली . पो.हे.कॉ.एस.बी.मोरे.करीत आहेत.
Post a Comment