कल्याण (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना कल्याण शहर महिला आघाडी, जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण आणि जायंटस ग्रूप ऑफ कल्याण मिड टाऊन सहेली यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख विजया ताई पोटे, जायंटस् प्रेसिडेंट प्रमोद जोशी आणि जी डब्ल्यू एफ ब्लड डोनेशन कॅम्प इन्चार्ज डिंपल दहिफुले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये एकूण ५० युनिट्स बॉटल रक्त जमा करण्यात आहे. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी कल्याण उपशहर संघटक सुनिता लेकावले, युवा सेना शहर संघटक सोनाली पाष्टे, अमोल गायकवाड, समीर मानकर, शेखर माऊसकर, दिपाली शहाणे, महेंद्र घोलप, मिलिंद चौधरी, उत्कर्ष आजगावकर यांनी विशेष सहकार्य दिले. या उपक्रमास जायटस् च्या वतीने वन सी प्रेसिडेंट अशोक मेहता, अॅड. यतीन गुजराथी, वीणा नाईक, जयश्री सातपुते, राजेंद्र भट, कौसल्या पाटील, करुणा काटकडे, राहुल मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
जायंटस् तर्फे रक्तदान शिबिर संपन्न
Admin Team
0
Post a Comment