तळा (किशोर पितळे)
तळा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. आणि तप्त झालेल्या जमीनीतुन गरम वाफा बाहेर पडत मातीचा नैसर्गिक सुगंधसर्वत्रदरवळला.सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले लॉकडाऊन मधून सूट मिळाल्याने तळाबाजारपेठेतील
सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सजविली होती मात्र अचानक दुपारी दोनच्या सुमारास पावसाने रिमझिम सुरवात करीतजोरदारपडायलासुरूवातकेली.अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही एकच धांदल उडाली.व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आवरायला सुरुवात केलीतर बाजारात छत्री घेऊन न आल्याने नागरिकांनी मिळेल त्या आडोशाला,पागाणी खाली उभे राहून स्वतःला भिजण्यापासून वाचवताना पाहायला मिळाले.लहान मुलांनी मात्र पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद लुटत चिंब भिजणे पसंद केले. उन्हाने लाही लाही झालेल्या शरीराला अचानक गार वाऱ्याची झुळूक लागल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत होते.
Post a Comment