श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
आगामी काही तासात येऊ घातलेल्या निसर्ग चक्रीवादळा च्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेने जोरदार तयारी सुरू केली आहे .त्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची तुकडी श्रीवर्धन ला पहाटे सकाळी ०४:३०च्या सुमारास हजर झाली आहे .श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर हे वादळाचे केंद्रबिंदू समजले जात आहे .दमण ते हरिहरेश्वर दरम्यान वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे . रायगड जिल्हा प्रशासनाने आगामी धोका ओळखून तात्काळ उपाय योजना करत संबधित सर्व विभागास योग्य ते निर्देश दिले आहेत .राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे ईश्वर मते यांच्या सह २० जवानांच्या तुकडीने श्रीवर्धन मधील स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे . राष्ट्रीय आपत्ती मोचन बलाचे उपनिरीक्षक ईश्वर मते यांनी स्वयंसेवकांनी कोणती कामे करावीत व कशी करावी या विषयी मार्गदर्शन केले .सदर प्रसंगी त्यांनी आपण करत असलेले कार्य हे देशसेवा असल्याचे म्हटले आहे .ईश्वर मते यांनी सर्वांना विविध साहित्याची माहिती दिली व त्याचा उपयोग कशा पद्धतीने करावा यांचे निर्देश दिले . सदर प्रसंगी श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे ,व तहसीलदार सचिन गोसावी उपस्थित होते .विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सभासदांनी स्वतः हुन स्वयंसेवक होण्यासाठी पसंती दर्शवली आहे .सदरच्या प्रशिक्षण प्रसंगी सोशल डिस्टन्स च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले .
वादळाने नुकसान होण्याची शक्यता आहे त्या कारणास्तव खबरदारी घेण्यासाठी व जनतेला सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत .आज स्वयंसेवकांना योग्य प्रशिक्षण दिले आहे .त्याचा निश्चितच आगामी काळात चांगला उपयोग होईल . सर्व स्वयंसेवकांचे आभार-ईश्वर मते (पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रीय आपत्ती मोचन बल सदूंबरे, पुणे )
निसर्ग वादळाने कोणतीही जीवित व आर्थिक हानी होऊ नये यासाठी योग्य ते आदेश देण्यात आले आहेत .धोकादायक भागातील लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत .-सचिन गोसावी (तहसीलदार श्रीवर्धन )
Post a Comment