तळा(किशोर पितळे)
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या पूर्वसूचनेनुसार अरबीसमुद्रात कमी दाबाचापट्टा तयार झाला असून वेगाने वारे वाहणे व अतिवृष्टीची शक्यताआहे.त्या पार्श्वभूमीवर तळानगरपंचायतीकडून शहरातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यासाठी नगरपंचायती मार्फत तळा बाजारपेठेतून माईकद्वारे दि २जूनच्या मध्यरात्री पासून शहरात जनता कर्फ्यु लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली यांसह नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये,कच्च्या व मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी नगरपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या कुणबी समाज सामाजिक सभागृहात तात्काळ स्थलांतरित व्हावे,स्थळांतर करताना घरातील गाई,गुरे,पाळीव प्राणी यांना देखील सुरक्षित स्थळी हलवावे,शहरातील तळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जोगवाडी व पुसाटी या वाड्यांनी विशेष काळजी घ्यावी,नागरिकांनी घरामध्ये पिण्याचे पाणी, टॉर्च,मेणबत्ती ई.वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवावा, वादळामुळे विजेच्या तारा, खांब पडण्याची शक्यता असल्याने अशा वस्तूंपासून लांब रहावे,झाडाखाली वाहने उभी करू नये,प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे नागरिकांनी पालन करावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना केले.
Post a Comment