योग दिनी कोरोना योध्यांचा ऑनलाईन सन्मान


ठाणे (गुरुदत्त वाकदेकर)
कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे आणि या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, पत्रकार, समाजसेवक आणि साहित्यिक यांनी अथक मेहनत करून समाजास मदत केली. त्यांनी आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण केला. त्यांच्या महनीय कार्याचा सन्मान व्हावा यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघ, ठाणे जिल्हा यांच्या वतीने ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र पत्रकार संघ राज्याध्यक्ष विलास कोळेकर यांच्या कल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. राज परब (ठाणे जिल्हा अध्यक्ष), राजेंद्र गोसावी (ठाणे शहर अध्यक्ष), हेमंत नेहते (तालुका अध्यक्ष), डॉ. योगेश जोशी (ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख) या निवड समितीने रमेश बाळू आंब्रे, खंडू वसंत कुडेकर, काशिनाथ चिंधा गोसावी, जयश्री काशीनाथ गोसावी, शालिनी राजेंद्र डुंबरे, विनिता कृष्णाजी गुजर, डॉ. प्रकाश संतोष माळी, अमित बाळू जाधव, राजेश मुरलीधर मढवी, प्रतिभा राजेश मढवी, विजय रामचंद्र जाधव, निशिकांत गोवर्धन महांकाळ, धन्यकुमार राजकुमार विभूते, सुरभी विद्याधर वालावलकर, सुबोध सहदेव कांबळे, सचिन सुरेश देशमाने, साक्षी शंकर परब, मीनल धारीराव घाडगे, दत्ता बबन घाडगे, रामदास दादाभाऊ वाढवणे, स्नेहा रमेश आंब्रे, अजय आनंदी-महादेव भोसले, विलास हरिश्चंद्र देवळेकर, डॉ. अभिजीत सोनवणे, वीणा अजय नाईक, डॉ. कोमल राजेंद्र भट, यशोदा किशोर पाटील, डिंपल दहिफुले, स्नेहल भरत सोपारकर, ज्योती वसंत कुडेकर आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर या कोरोना योध्यांची निवड केली आहे. त्यांना 'जागवली माणुसकी पुरस्कार २०२०' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सुप्रिया भारस्वाडकर (ठाणे जिल्हा सचिव) यांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा