निर्सग चक्रीवादळाने " म्हसळाकरांचे पाणी पुरवठ्याची केली दाणादाण "कोकणी डॉक्टर असोसीएशन ठरत आहे पाणी देवदूत"
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यांत म्हसळा शहर सोडून ८०% गावांतून नळ पाणीपुरवठा योजना या लिफ्टने पाणी चढवून वितरण या प्रकारच्या आहेत ३जूनला निर्सग चक्रीवादळाने श्रीवर्धन, म्हसळा,तळा,माणगाव,रोहा, मंडणगड यातालुक्यातील काही भागातून चक्रीवादळाने थैमान घातल्याने तालुक्यातील सर्वच ठिकाणची विजवितरण व्यवस्था पूर्णपणे बंद पडल्याने म्हसळा तालुक्यातील सुमारे ८०% जनता पिण्याचे पाण्या वाचून ३ जून पासून वंचीत झाली होती. ८जून पासून या सर्व भागातील पिडीत गावाना "कोकणी डॉक्टर असोसी एशन" ही सेवाभावी संस्था मदतीला चालून आली त्यानी या भागातील लोकाना मेणबत्ती पासून सोलर लॅम्प, कपडे, अन्नधान्य, ताडपत्री अशा बहुतांश वस्तू भेट स्वरुपांत दिल्या त्याच बरोबरीने विविध भागांत ८ते १० मोबाईल जनरेटर व्हॅन देऊन विजपुरवठा नसताना तब्बल ९०ते१०० नळ पाणी योजना कार्यान्वित करून ६० ते ७० हजार नागरिकाना पाणीपुरवठा केला त्यामुळे त्यांचे श्रीवर्धन, म्हसळा ,तळा,माणगाव,रोहा, बाणकोट या सर्वच तालुक्यांतून कोकणी डॉक्टर असोसिएशनचे कौतुक होत आहे.
जिल्हाधिकारी रायगड,ग्रा.पा.पु.उप-विभाग म्हसळा, पंचायत समिती यांच्या समन्वयाने शासनाने आणि कोकणी डॉक्टर असोसीएशन या संस्थेनी मोबाईल व्हॅन जनरेटर पुरवल्याने नैसर्गिक अपत्तीचे काळांत या भागातील जनतेला पाणी पुरवठा करण्यात यश मिळविले .
कोणकोणत्या तालुक्यातील गावाना केला पाणीपुरवठा.
म्हसळा तालुक्यातील८ गावे व ९ वाड्याना पाणी पुरवठा करणारी तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना यामधील खारगाव (खु), सकलप, तोंडसुरे, वरवठणे, आगरवाडा, पेडांबे, रेवली, गणेशनगर आणि अन्य ९वाड्या, मेंदडी,मेंदडी कोंड, मोहल्ला बौद्धवाडी, वारळ,काळसुरी,आंबेत,संदेरी, फळसप, खारगाव,खरसई,पानदरे,देवघर,पाभरे,चाफेवाडी,लिपणीवावे, घूम,नेवरूळ,कोंझरी, तळवडे, सुरई, खामगाव,कासरमळई, सोनघर गोंडघर,केलटे,कणघर,वांगणी,लेप,ता.शिर्के,तोराडी, दगडघूम आदी गाव वाडयाना पाणी पुरवठा केला , तशाच पध्दतीने रोहा तालुक्यातील ३२ गाववाड्या, श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी व अन्य गावे, माणगाव तालुक्यातील साई,चांढोरे, रानवडे, मंडणगड तालुक्यातील बाणकोट परिसरांतील गाववाड्याना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
शासनाने बजावली महत्त्वाची भूमिका
निर्सग चक्रीवादळाने श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा, मंडणगड यातालुक्यातील सर्वच भागातून थैमान घातल्यावर KDA कोकणी डॉक्टर असोसीएशन या सेवाभावी संस्थेने निर्सग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केलेल्या गावांतून कोणतीही प्रसीद्धी न घेता आपत्तीग्रस्ताना अन्नधान्य किट, मेणबत्ती, टॉर्च, ताडपत्री, कौले, पत्रे अशा आवश्यक साहित्याचे गरजवंताना वाटप केले, त्याच वेळी स्थानिक ग्रामस्थानी आमचे गावाला पिण्याचे पाण्याची आवश्यकता आसल्याचे सांगताच KDA चे मंडळीनी श्रीवर्धन म्हसळा तालुक्याना पाणी पुरवठा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ग्रा.पा.पु.उप-विभाग व गटविकास अधिकारी कार्यालयात संपर्कसाधून योग्य नियोजन करून वरील सर्व गावाना पाणी पुरवठा काही दिवसाच्या अंतराने करण्यास मदत केली. यासाठी KDA चेअरमन डॉ. वसीम पोफळणकर, डॉ.एम.एस. राऊत, डॉ. नसीम खान, डॉ. इम्रान फकीह ,उप-अभियंता युवराज गांगुर्डे, ग.वि.अ.वाय.एन. प्रभे, अभियंता अशोक कोकरे यानी उत्कृष्ट नियोजन केले. जिल्हाधिकारी रायगड ब KDA कोकणी डॉक्टर असोसीएशन यांच्या माध्यमातून 125 KVA चे 2 नग, 63KVAचे 2नग,40 KVA 2,30 KVA चे 3 नग श्रीवर्धन -म्हसळा मध्ये वापरात आसल्याचे अभियंता अशोक कोकरे यानी सांगितले.
"श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यांत काही गावांतून जुन्या ग्रॅव्हीटी योजना कार्यान्वीत आहेत आता पावसाळा सुरु झाल्यामुळे शक्य झाल्यास संबंधीत योजनेचे पाणी ग्रामस्थानी वापरुन प्रशासनाला सहकार्य करावे"
युवराज गांगुर्डे, उप- अभियंता , ग्रा.पा.पुरवठा उपविभाग, म्हसळा
Post a Comment