चक्रिवादळग्रस्तांना मिळणारी मदत ठाकरे सरकारची, तटकरे कुटुंबीय वैयक्तिक मदत करत असल्याचा आणतय आव.-जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे यांचा थेट आरोप.
बाबू शिर्के : म्हसळा वार्ताहर
करोनाच्या महामारीनंतर कोकणात मुख्यत:हा रायगड जिल्ह्यावर आलेल्या निसर्ग चक्रिवादळात रायगड वासियांचे अतोनात हाल झाले आहेत, लोकांची घर दारं उध्वस्त झालेली असताना देखील यात देखील तटकरे कुटुंबीय घाणेरडे राजकारण करत असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिलजी नवगुणे यांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा तालुका समुद्र किनारपट्टीजवळ असल्याने या भागात हवेचा जोर जास्त होता त्यामुळे शेतकरी, व्यापारी यांच्यासह बागायतदार यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र सबंध जिल्ह्याने बगितले या वादळात काही ठिकाणी जिवितहानी देखील झाली त्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती माझ्यासह प्रशासनाने मुख्यमंन्त्र्यांना दिली यांचीच गांभिर्याने दखल घेत रायगड दौरा करत चक्रिवादळग्रस्तांना १०० कोटींची मदत त्वरीत केली व रायगडवासियांना दिलासा दिला परंतु ठाकरे सरकारकडून आलेली हि मदत तटकरे कुटुंबीय आपली जहागिरदारी देत असल्याचा आव आणत गलिच्छ राजकारण करताना दिसत आहे. शासनाकडून आलेली मदत जिल्हाधिकारी, तहसीलदार , प्रांत, तलाटी, सभापती, स्थानिक लोकप्रतिनिधी, महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवर यांना विश्वासात घेऊन करायला हवी होती तेव्हाच मुख्यमंत्री महोदयांनी शासनाकडून पाठवलेली मदत गरजूंपर्यंत कोणताही भेदभाव न करता योग्य रितीने वेळीच पोहचली असती परंतु तटकरेंनी या मदतीला आपलीच जहागिरदारी समजून स्वतच्या पक्षातील काही निवडक जणांना सोबत घेत जाहिरात बाजी करण्यासाठी ना कोणा अधिकारी वर्गाला सोबत घेतले ना मित्र पक्षाला कळविले. जिवितहानी झालेल्यांच्या घरी १२ दिवस झाले नाही पण यांनी त्यांच्या नातेवाईकांना देखील सोडले नाही त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करण्याचे सोडून तिथे देखील तटकरे कुटुंबीयांनाच फोटोसेशन केल्याचा आरोप अनिल नवगुणे यांनी केला असून आज झालेला प्रसंग होऊन दोन आठवले होत आहेत परंतु श्रीवर्धन, म्हसळा, माणगावात आजून देखील वीज खंडीत असून लोकांना अंधारात ठेवून तटकरेंना प्रकाशात रहायला कसे आवडू शकते? असा खोचक सवाल देखील नवगुणे यांनी करत प्रसिद्धिच्या हव्यासापोटी पोरखेळ केलेल्या तटकरेंनी पालकमंत्री असल्याचे भान ठेवून आपण जिल्ह्याचे पालकमंन्त्री आहात फक्त राष्ट्रवादीचे नव्हे त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करा त्या गोष्टीला आपण नक्कीच मदत करू परंतु यापुढे देखील तटकरेंचा पोर खेळ असाच चालू राहिला तर थेट उद्धवजींकडे तक्रार करून पालकमंन्त्री निष्क्रीय असल्याचा पुरावा देऊन जबाबदार व्यक्तिला पालकमंन्त्री करण्याची मागणी लवकरच करू असा इशारा शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे यांनी दिला.
Post a Comment