...पण.. पण..रायगड संकटात सापडला तर त्याच्या संकटाला धावणार कोण?
विजय पांडुरंग कांबळे कापोली श्रीवर्धन रायगड 9767946364
रायगडाने अनेक वादळं अनुभवली.रायगडाला वादळं तशी नविन नाहीत. कितीही वादळं आली तरी ती परतून लावण्याची ताकद ह्या रायगडात आहे. वादळ आणि रायगड ह्याचे समीकरण अगदी कायम आहे.
पण ह्यावेळी वादळ आला तो समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे .
रायगडाला जणु शत्रूंनी चारही बाजूंनी घेरल्यागत चित्र पहायला मिळत होते.तरीही रायगड त्या वादळात ठाम न डळमळता उभा राहीला. वादळाचा आक्रमण इतका भयानक होता की तो ठरवूनच आला होता की,आज रायगडाला पुर्ण ताकदीने घेरायचाच
अरे,पण...त्याला कदाचित माहीत नसावं की
पण तो शिवरायांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेला रायगड असुन तो कधीच घाबरुन जाणारा नाही. तु जरी ताकदीने आला होतास तरीही तूला तो सामोरा गेलाच तोही न घाबरता...
वाईट एकाच गोष्टीचा वाटतं की, रायगड संकटात सापडला असताना त्याच्या मदतीसाठी कोण धावुन आला.त्याला गरज होती ती फक्त ज्या वेळी चक्रिवादळाच्या थैमानाने रायगडातील गरीब ,श्रीमंत लोकांच्या डोक्यावरील छत उडून गेले त्यावेळी ते फाटलेले ठीगळ, ठीगळ नाही तर सावलीच गायब झाली आहे. ती उडाल्याने सैरभैर झालेले लोक अक्षरशः वेड्यासारखे कौलं आणि पत्र्यांच्या शोधात बाहेर पडले पण हाती काहीच लागत नव्हते. जे काही सापडत होते तेही न परवडणारे होते.एक घरही असा नाही की त्या घरावर प्रसंग नाही.
तिथे प्रत्येक वस्तुला भाव आला होता. विज नसल्याने मेणबत्ती ही कधी नव्हे ती भाव खावुन गेली ती चारपट...प्रत्येक जण अगदी अंत पहात होता...
तेंव्हा गरज होती ती फक्त आधाराची!!
होय आधाराचीच. .पण आज एक हप्ता उलटून गेला तरी तरी लोकांना पत्रे मिळत नाही ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असु शकते?
लोकांना सहानुभुती नको, तर त्याने स्वतः गहान वेळ पडली तर कर्ज आणि त्याचे दागिने विकून पैसे जमा केले होते ना,त्या पैश्यांचे घरावर टाकायला पत्रे हवे होते. पण तेही कुठला जबाबदार माणुस जबाबदारी घेऊन उपलब्ध करुन देऊ शकत नाही ही शर्मेची बाब आहे. अनेक गावे पत्र्याविना मुलाबाळांसह उघडल्यावर पावसातच झोपत आहेत. त्यात विज नाही.पाऊस आला की रात्र रात्र घरातुन पाणी काढून त्या घरातच भिजत आहेत..
मग लोकांना असा प्रश्न पडला आहे की नेते मंडळी सोडाच ते येतात पहाणी करून बघुन जातात. पण ,रायगडाने भारतावर आलेल्या कुठल्याच मोठ्या प्रसंगात उडी घेतली नव्हती. की कधीच कुठली नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा उत्स्फूर्तपणे मदत केली नव्हती. मग आज महाराष्ट्रातील रायगड वासियांच्या वाट्यालाच हा दुजाभाव का?
हिच आपत्ती कुठे येऊ नये पण महाराष्ट्रातील अन्य भागात आली असती तर सर्वांत पुढे आमचा रायगड असला असता. आणि तो असतोच !!
त्याची प्रचिती तुम्हाला प्रत्येक वेळी आली असेल. आणि त्याचे साक्षीदार होतातच..
पण आज अशी परीस्थिती आहे की मदत सोडाच ..रायगडात घरावर टाकायला कुठलाही महाभाग पत्रे उपलब्ध करुन द्यायला तयार नाही. ग्रामस्थच वेड्यासारखे संपर्क करुन पत्रे भेटतील तिथुन आणुन घरावर टाकतायेत. कुणाचीही अपेक्षा न करता.
आता मात्र लोकं आपली भावना बोलुन दाखवतात की ह्यापुढे कुठेही कोणतेही संकटं येवो, रायगडातील लोकं त्यात उडी घेणार नाहीत. हा त्याचा राग आहे. कारण ते आर्थिक मदतीचा हात मागत नव्हते तर घरावर टाकायला स्वतःच्या पैश्याचे झाकण मागत होते.
तेही अजुन पुर्ण होत नाही. हाच प्रसंग इतर भागात ओडवला असता तर हीच राजकीय मंडळी जोर लावून आपली राजकीय ताकद वापरून कंपन्यांना आदेश देऊन त्या त्या भागात गाड्या आणायला लावल्या असत्या.
असो हेच दिवस राहणार नाहीत.
परमेश्वरा..
हे ही दिवस जातील....
आणि शिवरायांचा हा रायगड पुन्हा नव्याने उभा राहील मात्र कटु दिवस कधीच विसरणार नाही...
जनभावना ह्या कायम राहतील...
लेखन - विजय पांडुरंग कांबळे कापोली श्रीवर्धन रायगड 9767946364
Post a Comment