पर्यावरण दिनानिमित्य काव्य संमेलन संपन्न


कल्याण (गुरुदत्त वाकदेकर) : "गेल्या ३० वर्षांमध्ये शहरी वातावरणात श्रावणाचा आनंद उरला नाही. वातावरणात बदल झाला आहे, आषाढात सुद्धा अंगाची लाही लाही व्हायला लागली आहे. श्रावणमासी ही बालकवी यांची सुंदर कविता आणि त्यातलं वातावरण प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही. पर्यावरणाच्या ह्या अवस्थेस आपणच जबाबदार आहोत. आज कृत्रिम आणि निर्जीव वस्तूंचा पूर्ण वावर सुरू झाला असून आपण सजीव आहोत याचा आपल्याला विसर पडू लागला आहे आणि आपलं यंत्रात रुपांतर व्हायला लागलं आहे." असे परखड मत जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ अॅड. गिरीश राऊत यांनी व्यक्त केले. 

मराठी साहित्य व कला सेवा आणि अक्षर मुद्रा चॅनल आयोजित पर्यावरण दिनाचे निमित्ताने आयोजित निमंत्रित कवींचे ऑनलाईन कविसंमेलनाच्या  प्रसंगी ते बोलत होते. डॉ. योगेश जोशी यांचे हस्ते अॅड. गिरीश राऊत यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर  विजय म्हामुणकर, अजित महाडकर,  सानिका येडगे, जयश्री बापट, प्रसाद कुळकर्णी, मनीषा ताम्हणे, अश्विनी बोलके, संगीता कुलकर्णी, नमिता आफळे आणि गुरुदत्त वाकदेकर आदी मान्यवरांनी आपल्या उत्तमोत्तम रचना सादर करून कविसंमेलनात रंग भरला. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन ख्यातनाम निवेदिका पुजा काळे यांनी करून संमेलनास उंची प्राप्त करून दिली. अक्षर मुद्रा चॅनलचे डॉ. योगेश जोशी यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा