प्रशासकीय यंत्रणेने झोकून काम केले
श्रीवर्धन नगरपरिषदेत आढावा व पत्रकार परिषदेचे आयोजन
श्रीवर्धन (संतोष सापते )
०३ जून ला चक्रीवादळाने श्रीवर्धन उद्धवस्त केले आहे .शेतकरी ,सर्वसामान्य व्यक्ती त्रासला आहे .मात्र त्याने नाउमेद होऊ नये .आम्ही शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शना नुसार श्रीवर्धन चे गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देऊ असे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा व पत्रकार परिषदेत सांगितले .पत्रकारांशी संवाद साधत असताना सुनील तटकरे यांनी ०३जून नंतर विद्यमान सरकारने चक्रीवादळाने बाधित झालेल्या लोकांसाठी केलेल्या सर्व कामाची माहिती दिली .श्रीवर्धन मधील बागायतदार, सर्वसामान्य शेतकरी ,मजदूर सर्व घटकांना चक्रीवादळाने बाधित केले आहे .तालुक्यातील सर्व घरांचे नुकसान झाले आहे अगोदरच्या सरकारने विविध नैसर्गिक आपत्तीत दिलेल्या मदती पेक्षा जास्त मदत विद्यमान सरकारने जनतेला दिली आहे .आज मी व माझे संपूर्ण कुटुंब जनतेच्या दुःखात सहभागी आहोत .पालकमंत्री अदिती तटकरे ,विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे व स्वतः मी संपुर्ण रायगड जिल्ह्यात फिरून जनतेच्या समस्या जाऊन घेत आहोत .आजमितीस श्रीवर्धन तालुका प्रशासनाने २१ हजार व म्हसळा प्रशासनाने १३ हजार पंचनामे पुर्ण केले आहेत .अगोदर कोव्हीड व आता चक्रीवादळ या दोन्ही संकटात प्रशासकीय यंत्रणेने झोकून काम केले आहे .असे सुनील तटकरे यांनी सांगितले .पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत असताना शेतकरी व बागतदार यांच्या साठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वंकष प्रयत्न करत केले आहेत .सामान्य माणसाच्या घरासाठी दीड लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .अगोदर ही रक्कम अतिशय नगण्य स्वरूपात होती .चक्रीवादळात अन्नधान्य ,कपडे व इतर वस्तू यांची सुद्धा नुकसानभरपाई ची तरतुद सरकारने केली आहे .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार ,राज्य व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत व मी यांच्यात झालेल्या बैठकीत कोकणासाठी तात्काळ मदत देण्याचे ठरवले गेले त्या नुसार आपल्या श्रीवर्धन साठी अपेक्षित असलेली रक्कम ४५ कोटी आपण उपलब्ध करून घेतली आहे .या पूर्वी संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी १००कोटीचे मदत राज्य सरकारने दिली होती .आज त्या मदतीचा आकडा ३०१ कोटी पर्यत गेला आहे .कोकणच्या जनतेच्या पाठीशी विद्यमान सरकार ठामपणे उभे आहे .असे सुनील तटकरे यांनी सांगितले . कोळी बांधवांच्या क्षतिग्रस्त झालेल्या बोटीसाठी जास्तीत जास्त रक्कम मिळवण्यासाठी मी यशस्वी झालो आहे .कोळी समाजाच्या विविध मागण्यांना मी या पुर्वी व आता सुद्धा अग्रक्रम दिला आहे .कोळी समाजाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे .त्यामुळे कोळी समाजाने भीती बाळगू नये .येणाऱ्या काळात पुन्हा आपण नवीन भरारी घेणार आहोत .श्रीवर्धनचा पर्यटन विकास हा माझा ध्यास आहे .आगामी काळात विविध उपाययोजना करून आपन पर्यटन पुर्ववत करूच .पर्यटनावर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे .कोव्हीड मध्ये पर्यटन व्यवसाय पूर्णतः झोपला आहे मात्र पर्यटनास थोड्या दिवसात उभारी देऊ .त्या साठी विविध योजना आपण आपल्या भागात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत .शून्य व्याजदराने पर्यटक व्यवसायिकांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे .शेतकरी वर्गासाठी मोफत बियाणे आपण देऊ व शेतीसाठी लागणाऱ्या विविध रोजगार हमी योजना आपण आपल्या भागात आणणार आहोत .त्याच स्वरूपात पर्यटन विकास हा आपला अग्रणी मुद्दा आहे असे सुनील तटकरे यांनी सांगितले .विरोधक सत्तेत असताना सर्व आघाडीवर अपयशी ठरले होते .कोल्हापूर व सांगली ला पूर आल्यावर त्यांनी किती मदत केली हे सर्वांनी अनुभव ले आहे .मात्र विद्यमान सरकारने तात्काळ मदत दिली आहे .आम्ही आपत्ती व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात यशस्वी झालो आहोत .आपत्ती पुर्व , आपत्ती दरम्यान व आपत्ती पश्चात श्रीवर्धन तालुका प्रशासनाने अतिशय चांगले काम केले त्या कारणे जीवित हानी टाळण्यात आपण यशस्वी झालो आहोत .भरडखोल , दिघी , हरिहरेश्वर व श्रीवर्धन मधील जीवना सर्व ठिकाणी तालुका प्रशासनाने सुंदर नियोजन केले . स्थलांतरित निर्वासित लोकांना व्यवस्थित व चांगले अन्न पोहच केले आहे त्या बद्दल तालुक्यातील प्रशासकीय यंत्रनेला धन्यवाद दिली पाहिजेत असे तटकरे यांनी सांगितले .सदरच्या आढावा बैठकीला प्रांताधिकारी अमित शेडगे ,तहसीलदार सचिन गोसावी , मुख्याधिकारी किरणकुमार मोरे , राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दर्शन विचारे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक उपस्थित होते .
Post a Comment