निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या श्रीवर्धन- म्हसळ्याच्या दौऱ्याने म्हसळाकर " निर्सगचक्रीवादळाने केलेल्या संकटावर घातली फुंकर"
संजय खांबेटे : म्हसळा
श्रीवर्धन -म्हसळ्यावर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांचा दौरा करून मतदार संघासह रायगड जिल्ह्यावर आलेल्या संकटाचा आभ्यास दौरा केला व जनते जवळ थेट संर्पक साधून घरे, गुरांचे वाडे, शेती, आंबा, काजू, नारळ- सुपारी बागायतींचे नुकसानी बाबत माहीती घेऊन निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी माणगाव, म्हसळा येथील मदरसा, दिघी नाका,दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, कोळे, पांगळोली, आंबेत येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा केला.यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, महाड- पोलादपूरचे आमदार भरत शेट गोगावले, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक डॉ अनिल पारसकर,अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, माहिती अधिकारी मनोज सानप व इतर प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
वादळाच्या तडाख्याने संपूर्ण कोकणातील मुख्य उपजीवि- केचे साधन असणारी शेती, नारळ, सुपारी, पर्यटन, काजू व आंबा आदी व्यावसायिक त्याचप्रमाणे मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या नौका यांचे इंजिन खराब झाल्याने अतोनात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर शासकीय इमारती, शाळा -अंगणवाडयाच्या इमारती तसेच विद्युत वितरण कंपनीचे झालेले नुकसान फार मोठया प्रमाणात झाले आहे व त्यांच्यावर अवलंबून अनेक छोटे- मोठे व्यावसायिक संकटात आले, अनेक भागांतील पाणीपुरवठा खंडित आहे या सर्वांचा विचार करता राज्य व केंद्रसरकारकडे आम्ही पाठपुरावा करून निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीबाबत विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन जनतेजवळ पवार साहेबानी संवाद साधताना केले. म्हसळा तालुक्यात झालेल्या सर्वच नुकसानीची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सभापती बबन मनवे,तालुका अध्यक्ष समीर बनकर, म्हसळ्याचे मा.नगराध्यक्ष दिलीप कांबळे यानी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या मार्फत महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर मदत निधीची उपलब्धता व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
Post a Comment