राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधि पक्षनेते प्रविण दरेकर यांची म्हसळ्यात चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी : कोकणाच्या जनतेची थट्टा करू नका :विरोधी पक्ष नेत्याचा दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणि पवारसाहेब येतात : आ. दरेकर यांची सरकारवर सडकून टिका
म्हसळा (निकेश कोकचा )
निसर्ग चक्री वादळाणे बेजार केलेल्या रायगड व रत्नागिरी जिल्हयाचा नुकसान गस्त्र भागातील पाहणी दौऱ्याला मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सुरवात केली. शरद पवार यांच्या दौऱ्या आधी विरोधिपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी देखील याच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून, मी आल्यानंतरच सरकारला जाग येते अशी बोचरी टिका केली.
बुधवार दि. ३ जुन रोजी कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. या चक्री वादळाने रायगड जिल्ह्यातील म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील घरांचे व बागांचे ८० ते ९० टक्के प्रमाणात नुकसान केले आहे. कोरोनामुळे चार महिने बेजार असणाऱ्या श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील नागरीकांवर निसर्ग चक्रीवादळाचा प्रकोप झाल्याने या दोन तालुक्यात आर्थिक तंगी/ उपासमारीला सुरवात झाली आहे. याच अनुषंधाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी या नुकसानग्रस्त भागाचा धावता दौरा केला. खा. पवार यांनी म्हसळा शहरातील मदरसा व दिघी नाका येथे झालेल्या नुकसानाची धावती पाहणी केला. यावेळी त्यांचा सोबत पालकमंत्री ना.कु. अदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, सेनेचे आ. भरत शेट गोगावले, आ. अनिकेत तटकरे , अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाझीम हसवारे उपस्थित होते.
नुकसान ग्रस्त भागात विरोधी पक्षनेत्याच्या दौऱ्यानंतर मुख्यंमंत्री उद्ध्व ठाकरे व पवार साहेब दौरा करतात, हे नशिबच अशी बोचरी टिका महा विकास आघाडीवर विरोधी पक्षनेते आ. प्रविण दरेकर यांनी केली. मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांचा अलिबाग तर खा. पवार यांच्या आधि विरोधीपक्ष नेत आ. प्रविण दरेकर यांनी म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून जनतेच्या समस्या समजुन घेतल्या. दोन्ही नेत्यांचा दौऱ्यात जनतेनी देखील सरकारच्या मदतीवर सडकून टिका केली.
बुधवार दि. ३ जुन रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यात घर, पत्रे, कौल यांचा सहित विदयूत खांबाचा देखील मोठया प्रमाणात नुकसान झाला आहे . यामुळे हे दोनही तालुके ८ दिवसांपासून अंधारात आहेत.
Post a Comment