निर्सग" वादळाचे रौद्ररूप म्हसळा करानी पाहीले डोळ्यादेखत : निर्सगाने म्हसळा तालुक्याला केले बेचिराख ; मागील ७२ तासानी झाले म्हसळा कराना सुर्य दर्शन
संजय खांबेटे : म्हसळा
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे निसर्ग चक्री वादळात रूपांतर झाले. म्हसळे तालुक्यांत निर्सगाने रौद्र रुप धारण करुन सोसाटयाचा वारा सुटला तालुक्यांतील सुमारे १२ते १५ हजार घरांची व पडव्यांची पत्र्यांची पाखी(छप्पर) पडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ३जून सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत म्हसळा शहरासह तालुक्यांतील डोंगराळ भागात ६० ते ८० कि.मी. वेगाने तर खाडी पट्टयांत १०० ते ११० कि.मी. वेगाने वादळी वारे वहात होते असा अंदाज आहे .
तालुक्यातील खाडी पट्टयालगतच्या गावां सह आंबेत, रोहिणी आडी महाड खाडी, भेकरेचा कोंड, पाभरे, निगडी, खरसई, कांदळवाडा, मेंदडी, रेवली, वरवटणे, गोंडघर, खारगाव खुर्द, खारगाव ( बु) कणघर, लेप, कोळे, नेवरूळ, जांभूळ, घूम, साळविंडे ,मांदाटणे,ठाकरोली, कोळवट,केलटे, तोंडसुरे, घोणसे, खामगाव, कुडगाव, संदेरी, चिखलप,तोराडी, पांगळोली, देवघर, फळसप,वारळ, तुरुंबाडी, काळसूरी ह्या सर्व गावांतील घरे,आंबा- काजू बागायतींचे प्रचंड नुकसान झाले आहे.
तालुक्यातील १०० शाळांच्या इमारती, ८४ अंगणवाडया, १२ मिनी अंगण वाडयांच्या इमारतींचे छप्पर व अन्य ७० ते ८० % नुकसान झाले आहे.विज वितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरातील विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान १० ते १२ दिवस तर तालुक्यातील विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान २५ ते 30 दिवस लागण्याची शक्यता आहे. विज वितरणचे H.T लाईनचे किमान ७०० ते ८०० व L.T. लाईनचे किमान ४०० ते ५०० पोल पडल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातील म्हसळा शहर नगरपंचायतीसह व ३९ ग्रामपंचा-यतीतील ४५ वाडयांवरीत सुमारे १२ ते१५हजार घरांचे मध्यम ते तीव्र स्वरूपाचे नुकसान झाले,म्हसळा शहरातील ६७ दोन ते तीन मजली घरांवरील फेब्रीकेटेड स्ट्रक्चरल शेड वरील पत्रे व स्ट्रक्चर उडून करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे तालुक्यांत आंबा ( १८७९ एकर) व काजू (७७० एकर) क्षेत्र बागायती खाली आसून सुमारे ३० ते ३५ हजार आंबा कलमे पडून मोडून नुकसान झाले आहे तर १० ते ११ हजार काजू झाडांचे अपरिमीत नुकसान झाले. तालुक्यातील ५००o हेवटर वन क्षेत्रांतील किमान ३ते ४ हजार मोठे वृक्ष कोसळले आहेत. लोणेरे -गोरेगाव - म्हसळा- श्रीवर्धन मार्गावरील सुमारे ९० ते ११० वर्षाचे जुने ३३ वटवृक्ष जमीन दोस्त झाले.
"तालुक्यांत असणारे वनक्षेत्र हे जुने असल्याने त्यानी थोडया फार प्रमाणांत वादळ थांबवल्याने वनक्षेत्रा जवळील गावांना वादळाची तीव्रता कमी जाणवली, त्याच कारणानी वनक्षेत्रां तील वृक्ष पड कमी झाली झाडांचे फांद्या तुटण्याचे प्रमाण जास्त झाले"
नरेश पाटील, परिक्षेत्र वनअधिकारी , म्हसळा.
" मागील कित्येक वर्षांत अशा प्रकारचे वादळ बघण्यात व ऐकण्यात नाही, शहरांतील २-३ मजली इमारतींचे रुफ मुळे शहरांतील अन्य कौलारू इमारतींचे अतोनात नुकसान झाले."
कमळाकर उर्फ नाना करडे.(जेष्ठ नागरिक)
" तालुक्यांत बहुतांश आंबा बागायती वीरळ (एकरी३५ ते ४० कलमे) असल्याने आंबा कलमांचे फार मोठे नुकसान झाले , आंबा बागायत दाराना सरकारने एकरी २०लक्ष नुकसान द्यावे"
फैयाज उकये, आंबा बागायतदार.
म्हसळा तालुका, महावितरण वीज बाबतीत दखल घेत नाही किंवा विजेच्या खांब जवळील झाड झुडपं साफ करताना त्यांना अद्याप पाहिले नाही.
ReplyDeletePost a Comment