प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात अक्षरशः थैमान मांडले होते. यात अंदाजे 5 लाख घरांचे अतोनात नुकसान झाले असल्याची माहिती पुढे येत आहे. 3 जणांचे मृत्यू झाले आहेत. हजारो वृक्ष उन्मळून पडली आहेत. वीज पोल, तारा तुटून पडल्या आहेत. आंबा, नारळी, फोफळीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय घोषणा करतात? याकडे सर्वांचे लक्ष होते.
निसर्ग चक्रीवादळातील रायगड जिल्ह्यामधील नुकसानग्रस्तांसाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी आज(५ जून) पाहणी करून तात्काळ रु. १०० कोटींची तात्पुरती मदत जाहीर केली.
मात्र करोनामुळे परिस्थिती अधिक गंभीर आहे. करोनाच्या काळात अनेकांचे रोजगार व उत्पन्नाची साधने मर्यादित झाल्यामुळे रायगड जिल्ह्यात अनेकजण आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. काही जणांचे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधील रोजगार कमी झाल्याने ते गावाकडे आले आहेत. अशावेळी शासनाने देऊ केलेली ही तात्पुरती मदत कमी पडू शकते. म्हणूनच ज्या घरांचे कमी प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना रु. ५०,००० व मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या घरांना रु. १.५० लाखांची मदत शासनाने द्यावी कोकणातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ३०-४० वर्ष किंवा त्याहून अधिक काळ जोपासलेल्या बागा क्षणात आडव्या झाल्या आहेत. करोनाच्या काळात या बागांतून येणार्या उत्पन्नावर अवलंबून असा मोठा वर्ग कोकणात आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देताना शासनाने एकरी किंवा हेक्टरी न देता प्रत्येक झाडामागे द्यावी.
आंबा - रु. १५,०००
नारळ - रु. १०,०००
काजू - रु. १०,०००
सुपारी - रु. ५०००
या प्रमाणे प्रत्येक झाडामागे शासनाने नुकसान भरपाई द्यावी, मागणी अनिकेत तटकरे यांनी केली आहे.
Post a Comment