कोकणामध्ये गुंठ्यात शेती करणारे शेतकरी असून १५% नुकसानीचे निकष राज्य शासनाने लावू नये : बागायत धारकांना प्रतेक झाडामागे नुकसान भरपाई मिळवून देणार आ.अनिकेत तटकरे
म्हसळा तालुक्यात १००% घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना आ.अनिकेत तटकरे यांच्या मार्फत प्रतेकी दीड लाखाचा धनादेश वाटप
म्हसळा(निकेश कोकचा)
कोकण पाट्यातील शेतकर्यांकडे शेती ही गुंठयात आहे.राज्य सरकारने या शेतकर्यांना हेक्टरी नुकसान भरपाई न देता गुंठयामागे द्यावी व घरांचे नुकसान झालेल्यांना १५ % नुकसानीचे निकष लावू नये अशी मागणी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ.अनिकेत तटकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. चक्री वादळाचा केंद्र बिंदु श्रीवर्धन असल्याने श्रीवर्धन,म्हसळा,तळा,रोहा माणगाव तालुक्यांना यावादळाचा मोठा फटका बसला आहे. म्हसळा तालुक्यात देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून ,या नुकसानीमद्धे घरांचे पूर्णतः नुकसान झालेल्या २९ कुटुंबांना आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते प्रतेकी दीड लाखाच्या धांनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,प्रांताधिकारी अमित शेडगे,म्हसळा सभापती उज्वला सावंत,सदस्य छाया म्हात्रे,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नजिम हसवारे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,सर्कल दत्ता कर्चे,शाह तात्या उपस्थित होते.ही मदत फक्त पूर्णता नुकसान झालेल्या कुटुंबाला असून गावातील इतर नुकसान झालेल्या घर धारकांना पुढील आठवड्यामद्धे मदत मिळणार असल्याचे आ.तटकरे यांनी संगितले.
कोकण परिसरामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे बागायतदारांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने ही नुकसान भरपाई प्रतेक झाडाचे वय,त्याचे उत्पन्न याचे निकष ठरवून द्यावी अशी मागणी देखील आ.अनिकेत तटकरे यांनी केली आहे.
मागील सरकारच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या सरकारने नुकसानीचे सर्वच निकष बदलून कोकणातील जनतेला खरा न्याय देण्याचा प्रयत्न केला .
-आ.अनिकेत तटकरे यांनी संगितले.
फोटो- म्हसळा तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे घरांचे १००% नुकसान झालेल्या २९ नुकसानग्रस्तांना प्रतेकी दीड लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले असताना आ.अनिकेत तटकरे,प्रांताधिकारी अमित शेडगे,जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,म्हसळा सभापती उज्वला सावंत,तालुकाध्यक्ष समीर बनकर,पंचायत समिति सदस्य छाया म्हात्रे व राष्ट्रवादीचे युवा उद्योजक जमीरभाई नजिरी दिसत आहेत. छाया-निकेश कोकचा
Post a Comment