प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. यानंतरच नुकसानीचा आकडा येईल. त्याआधी तातडीची मदत म्हणून जिल्ह्यातला 100 कोटींची मदत करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी (5 जून) जिल्ह्यातील अलिबागच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी थळ येते धावती भेट देऊन पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढवा घेतला. यावेळी त्यांनी रायगडकरांचे कौतुक केले. एका वादळाला मोठ्या धैर्याने रायगडकर सामोरे गेल्याचे ते म्हणाले.
चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात अक्षरशः थैमान मांडले होते. यात सुमारे 5 लाख घरांचे अतोनात नुकसान झाले असल्याची माहिती पुढे येत आहे. 3 जणांचे मृत्यू झाले आहेत. हजारो वृक्ष उन्मळून पडली आहेत. वीज पोल, तारा तुटून पडल्या आहेत. आंबा, नारळी, फोफळीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय घोषणा करतात? याकडे सर्वांचे लक्ष होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण ठळक मुद्दे
# चक्रीवादळात 6 जणांचा मृत्यू झाला
# पंचनामे पूर्ण व्हायला वेळ लागेल पण तातडीने 100 कोटी रुपये रायगड जिल्ह्यासाठी देतोय.
# पंचनामे पूर्ण झाल्यावर आणखी आर्थिक मदत देता येईल.
# आपत्ती काळात जीवित हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने प्राणहानी झाली,
# हे नुकसान भरून येणार नाही, शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी शासन प्रयत्न करणार .
# कोरोना संकट आहेच,काळजी घेतली त्यात वादळ आले,आता पुन्हा नव्याने सुरू करायचे आहे,
# प्रथम झाडांची साफसफाई करावी,आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत केली जाईल,
# आज मी आपले कौतुक करण्यासाठी आलो आहे,
# संकट सर्वांसाठी असते,पक्ष मतभेद विसरून आपण एकत्र काम करून रायगड जिल्हा पुन्हा उभा करू.
# घरांची पडझड झाली आहे त्याना तातडीने मदत करणार.
# मच्छिमारांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्द्ल शासन मदत देणार.
Post a Comment