श्रीवर्धन संतोष सापते
०३ जून ला श्रीवर्धन मध्ये चक्रीवादळाने अनेक घरे उध्वस्त करून अनेक कुटुंब उघड्यावर पाडले आहेत . अगोदरच कोरोना ने आर्थिक बाजू कमकुवत झाली त्यात चक्रीवादळाने जीव नकोसा केला आहे .शासकीय मदत अद्यपा लोकां पर्यंत पोहचण्यास वेळ लागत असताना युनियन बँक अधिकारी महासंघाच्या वतीने श्रीवर्धन मधील गायगोठण , व खालचा जीवना या ठिकाणी अन्न धान्याच्या किट ची वाटप करण्यात आली .युनियन बँक अधिकारी संघाच्या वतीने। जनरल सेक्रेटरी मुंबई परेश नाखवा , राजेंद्र दापत व किरण झांबरे आणि नगरपालिका मुख्याधिकारी किरणकुमार मोरे , प्रसाद डोंगरे यांनी वाटप केली .श्रीवर्धन नगरपरिषदेच्या हद्दीतील शाळेत अनेक निर्वासितांना ठेवण्यात आले आहेत .गायगोठण व खालचा जीवना या भागात जवळ २०० अन्न धान्याच्या पॉकेट ची वाटप करण्यात आली आहे .सदरच्या कीट मध्ये तांदूळ , डाळ , तेल , मसाला ,मेणबत्ती ,काडेपेटी आदी साहित्याचा समावेश करण्यात आला आहे .श्रीवर्धन मध्ये गेल्या दोन दिवसात मोठया प्रमाणात पाऊस पडत असताना सुद्धा युनियन बँकेच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंची वाटप करण्यात आली .दोन्ही विभागातील वाटप करताना युनियन बँक प्रतिनिधी नी प्रत्येक घरात जाऊन वस्तूची वाटप केली व सदर वाटप करत असताना सोशल डिस्टन्स च्या नियमांचे पूर्णतः पालन करण्यात आले .
Post a Comment